80 मद्यपीं चालकांना दंड 

spot_img
 नागपूर. मुंबई दारूबंदी कायद्यान्वये 6 प्रकरणात 7 आरोपींना अटक करून 58 हजार 352 रुपयांचा तर जुगार बंदी कायद्यान्वये 3 प्रकरणात 7 आरोपींना अटक करून 3 हजार 115 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या 80 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण 879 वाहन चालकांवर कारवाई केली. तडजोड शुल्क म्हणून त्यांच्याकडून 2 लाख 36 हजार 100 रुपये वसूल करण्यात आले. वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलिसांतर्फे राबविण्यात आली. या पुढेही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येणार असून वाहनचालकांनी वाहन चालविताना वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़