सुरक्षा यंत्रणेच्या पूर्वसूचनेकडे केंद्राने केले हेतूपुरस्सर दुर्लक्ष! प्रकाश आंबेडकर यांचे विधान

spot_img

नागपूर: पुलवामा घटनेच्या दहा दिवसांपूर्वीच काश्‍मीरमधील एसएसपी पीसीआरने काश्‍मीर झोनच्या आयजीपीला चिठ्ठी लिहून अशी घटना होऊ शकते अशी सूचना दिली होती. आपलेे स्थान सोडण्या पूर्वी संपूर्ण भाग हा सेनिटाईझ करण्यात यावा अशी महत्वपूर्ण सूचना यात दिली होती. अतिशय महत्वपूर्ण सूचना असा शेरा या पत्रात दिला होता. मात्र केंद्राच्या सरकारने या अतिशय महत्वपूर्ण सूचनकडे हेतुपुरस्सर दूर्लक्ष् केले का? अशी सूचना मिळाल्यानंतर केंद्राने मंत्रीमंडळाची बैठक घेतली यांनाही का? बैठकीत कोणता निर्णय घेण्यात आला कि निर्णयच घेण्यात नाही आला? अशी प्रश्‍ने वंचित बहूजन आघाडीचे नेते डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी नागपूरात पत्र-परिषद घेऊन विचारली.
मी पंतप्रधान आणि मंत्रीमंडळातील केंद्रीय मंत्री म्हणून गडकरी यांना हे प्रश्‍न विचारु इच्छितो असे ते म्हणाले. दहा दिवसांपूर्वीच इतकी महत्वाची माहिती मिळाल्यानंतरही केंद्राने कोणती पावले उचललीत?या माहीतीकडे दूर्लक्ष् करण्यात आले का? असे दूर्लक्ष् कोणत्या कारणासाठी करण्यात आले?या घटनेला कोण जबाबदार आहे? कॉन्वेमध्ये चालणाऱ्या गाड्यांमध्ये कोणत्याही बाहेरील हल्लापासून बचावासाठी यंत्रे बसवली असतात मात्र दोनशे किलो आरडीएक्स घेऊन सैनिकांची जी गाडी उडवण्यात आली त्यात असे यंत्र का नव्हते? या पत्रावर ‘तातडीची सूचना’(एक्सट्रीम्ली अर्जेंट) असे लिहले होते. मग यावर घटना रोखण्यासाठी कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही,याचे उत्तर पंत्रप्रधान मोदी तर नाही देणार मात्र ‘हाेणारे पंतप्रधान’ गडकरी यांनी द्यावे असे आंबेडकर म्हणालेे.
या घटनेची माहिती राष्ट्रीय स्वयं संघाच्या अध्यक्ष यांनाही होती असे आरोप त्यांनी केला. संघाच्या अध्यक्ष् यांनाही राष्ट्राची संबंधित प्रत्येक गोष्ट माहिती असते याचाच अर्थ अशी घटना घडणार आहे,याची देखील माहिती असावी. याप्रसंगी आंबेडकर यांनी काश्‍मीच्या एसएसपी पीसीआर यांचे पत्र पत्रकारांना वितरित केले. हे पत्र आजवर सार्वजनिक नव्हते मात्र ते मी केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने केलेल्या हवाई हल्ल्याला जरी विरोध झाला नाही तरी असेच खोटे बोलत राहू तर एक दिवस त्यांचाही विश्‍वास आपण गमावून बसू असे ते म्हणाले.

काँग्रेसकडे मतदारच नाही्!
भंडारा-गोंदया जिल्ह्याच्या प्रश्‍नावर उत्तर देताना आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाकडे स्वत:चा मतदार उरला नसल्याचे सांगितले. शरद पवार यांनी आधी निवडणूक लढवणार असे सांगितले मात्र आपण जिंकू शकणार नाही हा ‘हवा का रुख’ त्यांनी ओळखला आणि माघार घेतली. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात याच कारणामुळे कमकुवत उमेदवार देण्यात आला. चंद्रूपरला सेनेचा उमेदवार आयात केला.
काँग्रेसचे आरएसएसकरणाची सुरवात होतेय.वर्धा, अमरावती,यवतमाळ येथील त्यांनी जे उमेदवार जाहीर केले त्यातून चित्र स्पष्ट होते. सर्व निवडणूक क्षेत्रात वंचित आघाडीची लढत ही फक्त भाजपाशीच आहे. नागपूरात नाना पटोलेंना उमेदवारी देऊन कॉंग्रेसने गडकरींचा माग सोपा केला असल्याची चर्चा पटोले हे ‘डमी’ उमेदवार असल्याचे ते म्हणाले. नागपूरात काँग्रेसला दलित मते मिळणार नाही,दलित सोबत नाही तर मुस्लिमही सोबत नाही. हलबांची मतेही गडकरींच्या विरोधात आहे. नागपूरात गडकरींनी दलित,मुस्लिम,हलबांची मिळून १० लाख मते गमावली आहे,उर्वरित ११ लाख मतांपैकी कुणबी मतदार हा दुंभगलेला आहे. गांधी विचारधारेवर विश्‍वास असणारे कुणबी मतांना नक्कीच माझ्याकडे वळवण्यास यश मिळेल,असे ते म्हणाले.
काँग्रेससोबत युती कां केली नाही?या प्रश्‍नाच्या उत्तरावर काँग्रेसनेच कोणासोबतही युती केलेली नाही. बिहारमध्ये तर काँग्रेस फक्त जागा लढवत आहे. भाजपच्या ब्लॅकमेंलींगला काँग्रेस बळी पडल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भाच्या सर्व मतदार संघात भाजप आणि वंंचित आघाडी यांचीच सीधी लढत आहे. नागपूरवरुन उमेदवारी अर्ज यासाठी नाही भरला कारण सोलापूरसोबत माझी ‘बांधिलकी’आहे. धनगरांचे आंदोलनामुळे माझे तिथे उमेदवार म्हणून उभे राहणं महत्वाचे होतं. माझ्या उमेदवारीमुळे तेथील १४ जागा चांगल्या स्थितीत आल्या. भाजप किवां काँग्रेसने कितीही पैसांचे आमिष दाखवले तरी मतदान वंचितलाच करतील असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
विदर्भाच्या प्रश्‍नावर आम्ही विदर्भाच्या मागणीचे समर्थन करतो,लहान राज्ये विकासासाठी गरजेचे असतात असे ते म्हणाले.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़