अतिक्रमण हटविण्यासाठी दुकानदारांना तीन दिवसाची मुदत
*नागपूर ०५ :* मौजा सीताबर्डी येथील खसरा क्रमांक ३२० व ३१५ या नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवरील ३३ दुकानांना दिनांक २४ एप्रिल २०१५ रोजी विभागीय कार्यालय (पश्चिम) तर्फे नोटीस तामिल करण्यात आले होते. मा. सर्वोच्च न्यायालयाने सर्व नोटीस कायम करून स्पेशल लिव्ह पिटिशन ३२०८९/२०१६ मध्ये दिलेल्या आदेशानुसार आज दिनांक ०५ फेब्रुवारी २०१९ रोजी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली.
सीताबर्डी येथील दुकानदारांच्या शिष्ठमंडळाने नासुप्र सभापतींना विनंती केल्याप्रमाणे सर्व दुकानदारांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली. दुकानदारांने तीन दिवसात अतिक्रमण न हटविल्यास नागपूर सुधार प्रन्यासतर्फे दिनांक ०९ फेब्रुवारी २०१९ पासून पुन्हा कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद दुकानदारांना देण्यात आली आहे.
यावेळी कार्यकारी अभियंता(पश्चिम) श्री. प्रमोद धनकर, कार्यकारी अभियंता(तांत्रिक) श्री. मनोज ईटकेलवार, विभागीय अधिकारी (पश्चिम) श्री. पंकज आंभोरकर, सहाय्यक अभियंता-२ श्री. विवेक डफरे, सहाय्यक अभियंता-२ श्रीमती पी.आर. शहारे, स्थापत्य अभि. सहाय्यक श्री. अजय वासनिक, विद्युत अभियंता श्री. विनायक झाडे, स्थापत्य अभि. सहाय्यक श्री. निलेश तिरपुडे आणि नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख श्री.मनोहर पाटील तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सीताबर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.




Subscribe to Awaz VIdarbha Nagpur