
नागपूर: नागपूर हे शहर आज जगात सर्वात वेगाने विकसित होत आहे,व्यापारी,कारोबारी,निवेशक नागपूर मध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत,केंद्र व राज्याच्या सरकारने सातत्याने या शहराच्या विकासाची प्रक्रिया राबवली. ‘मेट्रो’ सारखे प्रकल्प येतात तेव्हा शहर अधिक वेगाने विकसित होतात, हजारो लोकांना रोजगार मिळतो,२०५० मध्ये नागपूरची लोकसंख्या दुप्पट होणार त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आजच विचार करणे गरजेचे आहे, नागपूर शहरात आज ‘माझी मेट्रो’ चे जे लोकार्पण झाले याचा मला नितांत आणि दुहेरी आनंद होत आहे कारण २०१४ मध्ये माझ्याच हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन झाले होते. एक दिवस संत्र्या प्रमाणेच नागपूरची ‘माझी मेट्रो’ जगात प्रसिद्ध होणार याची मला खात्री आहे,असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले, दिल्लीतून व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून सायंकाळी ५.३० वाजता त्यांच्या हस्ते उदघाटन पार पडले,यावेळी त्यांनी उपस्थितांशी व्हिडीओ लिंकद्वारेच वरील संवाद साधला.खापरी ते सीताबर्डी मेट्रो मार्गाचा त्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ पार पडला. वर्धा मार्गावरील एअरपोर्ट साऊथ स्टेशनला हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, खा. विकास महात्मे, ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना मोदी म्हणाले,की २१ साव्या शतकाच्या गरजा लक्षात घेऊनच आम्ही प्रकल्प तयार करीत आहोत. २०१४ पूर्वी देशभरात मेट्रोचे नेटवर्क फक्त २१० कि. मी. होते. साढे चार वर्षात आम्ही ते ६३० कि. मी.पर्यंत वाढवले. जेव्हापासून तुम्ही एक ‘मजबूर’ सरकारला विदाई देऊन ‘मजबूत’ सरकार निवडली,त्यामुळेच विकासाचे हे परिवर्तन घडून आले,असा ‘टोला’ त्यांनी युपीए सरकारला लगवला. आधुनिक मेट्रोचे निर्माण वाजपेयी यांनी सुरू केले होते,त्यांच्या नंतर मेट्रो फक्त २१० कि. मी च चालू शकली मात्र आमच्या सरकारने फक्त साढे चार वर्षांत यात ४०० कि. मी ची भर टाकली तर देशात ८०० कि. मी चे काम सुरू आहे. यात महाराष्ट्रातील मुंबई,ठाणे,पुणे या शहरांचा समावेश आहे. यावेळी बोलताना त्यांनी ‘one nation one card’ याचाही उल्लेख केला. वेगवेगळ्या शहरात,वेगवेगळ्या सुविधांसाठी आता ‘common mobality card’ चा वापर होऊ शकेल. आपल्या देशाने तंत्रज्ञानात खूप प्रगती केली असून हे सर्व शोध ‘मेड इन इंडिया’ असल्याचे त्यांनी सांगितले.२०१४ पूर्वी ज्याचा विचारही केला जाऊ शकत नव्हता ती सगळी प्रगती वास्तवतेत उतरली. फक्त विकासातच सामान्य माणसाची प्रगती आहे त्यामुळेच ‘सबका साथ सबका विकास’ हाच मंत्र घेऊन काम केल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री यांचे निमंत्रण स्वीकारले-
आपल्या भाषणाच्या सुरवातीला मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान यांना नागपूरला येण्याचे निमंत्रण दिले. मे किंवा जून नंतर जेव्हा कधी हा प्रकल्प पूर्ण होईल,मी तुमच्या सेवेत हजर राहील,अशी भावनिक साद मोदी यांनी नागपूरकरांना घातली.
मोदींची अस्सलिखीत ‘मराठी’-
‘नागपूरच्या सर्व नागरिकांना माझा मनःपूर्वक नमस्कार, बऱ्याच वर्षांपूर्वी नागपूरच्या लोकांनी पाहिलेले मेट्रो रेल्वेचे स्वप्न आज पूर्ण होत आहे.तुमच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसतोय,तो बघून मलाही आनंद होतोय’ अश्या अस्सलिखीत मराठीत मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ऑरेंज सिटी नागपूर आजपासून मेट्रो सिटी झाली याचे त्यांनी अभिनंदन केले. आजपासून नागपूर देशाच्या त्या शहरांमध्ये शामिल झाला ज्या शहरात मेट्रो सारखी अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था आहे. महाराष्ट्र ची राजधानी आणि उपराजधानी दोघांनाही मेट्रोचा तोहफा मिळाल्याचे ते म्हणाले. आपल्या भाषणाचा शेवट देखील त्यांनी मराठीतच केला आणि उपस्थितांची मने जिंकली.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur