नागपूर. शहरातील खंडणी बहाद्दरांनी आता नामांकित डॉक्टरांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. शिवाजी नगरातील एका डॉक्टर दांम्पत्यास ५० लाखाची खंडणी मागितल्याचे उघडकीस आले आहे. ओळखपटू नये यासाठी चोरीचे सिम कार्ड वापरण्यात आले. गंभीर गुन्हा गुन्हे शाखेच्या युनिट क्र.-२ ने उघडकीस आणला. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या.
शिवाजी नगर सिमेंट रोड लोटस अपार्टमेंट येथे राहणारे आशिष अरूणराव चौधरी व त्यांची पत्नी सपना चौधरी दोघेही डॉक्टर असून, त्यांचा गांधी नगरात दवाखाना आहे. डॉ. आशिष यांची पत्नी सपना ह्या ८ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा दहा वाजताचे सुमारास घरी असताना, संघटना नावाचे पत्र पोस्टमन ने चौकीदाराचे हाती दिले. यात त्यांना संघटनेला ५० लाखांची खंडणी द्यावी लागेल असे नमूद करण्यात आले होते.
यानंतर ११ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३५ वाजताचे सुमारास आरोपीने ९०९८८९७७४२६ क्रमांकाच्या मोबाईलवरून सपना ह्यांना फोन केला व ‘लेटर पढा क्या, नही पढा होंगा तो मै बता देता हू , ५० लाख तैयार रखना. आपके बच्चे कहा जाते है, हमे पता है, उठा लेंगे’, असा इशारा देऊन त्यांना व त्यांच्या कुटंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. खंडणीसाठी मुलाचे अपहरण करून जिवे ठार करण्याच्या घटना उपराजधानीत यापूर्वी घडल्या आहे. यामुळे मुलांच्या अपहरणाच्या भितीने सपना ह्या फारच घाबरल्या आणि त्यांनी ही गोष्ट पती डॉ. आशिष यांना सांगितली. डॉ. आशिष चौधरी यांच्या तक्रारीवरुन अंबाझरी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून, खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीचा मोबाईल क्रमांका वरुन शोध घेणे सुरू केले.
डॉ. चौधरी दाम्पत्यास ५० लाखांची खंडणीची मागणी करताना आपली ओळख पटू नये याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी मोहसीन खान नावाच्या खंडणीबहाद्दराने अब्दुल वाहीद अब्दुल हमीद या साथीदाराची मदत घेतली व त्याला खंडणी उकळण्यासाठी एखादे सिम कार्ड जमवून द्यावे. मिळालेल्या खंडणीतील काही पैसे तुला देण्यात येईल असे सांगितले. अब्दुल वाहीद हा खिसे कापू असून, रेल्वेत चोऱ्या करतो. त्याने नागपूर रेल्वेस्टेशनवर रायपूरकडे जाणाऱ्या गाडीतून एका प्रवाशाचा मोबाईल चोरला व त्यातील सिम कार्ड काढून मोहसीनला दिले. मोहसीनने या सिम कार्डवरून मोबाईलवर खंडणीसाठी फोन केला. मोमीनपुरा येथील रहिवासी असलेला मोहसीन खान गणेशपेठ भागात खंडणी वसुली करतो, अशी माहिती सूत्राकडून मिळाली. खंडणीसाठी वापरलेल्या मोबाईलचा शोध घेत असताना गुन्हेशाखेच्या युनिट क्र. -२चे पोलिस निरीक्षक आंचल मुदगल व त्यांच्या पथकाला आरोपी वाहीदची माहिती मिळाली. यावरून त्यांनी वाहीद ला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मोहसीन खंडणी वसुलीतील काही पैसे आपल्याला देणार होता. याकरिता मोबाईल चोरून सिम दिल्याचे सांगितले असल्याचे समजते. गुन्हे शाखा ही कारवाई करीत असतानाच अंबाझरी पोलिसांनी मोहसीन खानला ताब्यात घेतले. गुन्हे शाखा पोलिसांनी वाहीदची चौकशी करून अंबाझरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
शिवाजी नगरात डॉक्टरला खंडणी बहाद्दरांची धमकी
Youtube वीडियोस
1
/
205
नवनियुक्त काँग्रेस शहर अध्यक्ष गुडदे पाटील यांची सदिच्छा भेट#आदिवासी समाज संघटना
जनतेची फसवणूक#नागपूर#ग्रीन नेट महानगरपालिके कडून#65 लाखांची उधळपट्टी#
आदिवासी काँग्रेस कमिटीची प्रदेश स्तरीय बैठक नागपूर येथे संपन्न#प्राचार्य वसंतरावजी पुरके#
Shivansh#Masram 1st Birthday# Celebration#short#video#viral#
मा.रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक विभागाचे मंत्री#सामाजिक मुद्द्यांवर पत्रकारांशी चर्चा
आदिवासी विद्यार्थ्यांचा आदिवासी विकास विभागावर धडक मोर्चा#विद्यार्थ्यांच्या मूलभूत मागण्या
1
/
205



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur