शहांच्या शक्तीप्रदर्शनात एनडीए एकजूट:गांधीनगरमधून भरला उमेदवारी अर्ज

spot_img

 

अहमदाबाद :  भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी शनिवारी (30 मार्च)  लोकसभेचा  गुजरातच्या गांधीनगरमधून आपला उमेदवारी अर्ज भरला. याप्रसंगी एनडीएचे घटक पक्ष् अवार्जून हजर होते. अकाली दलाचे अध्यक्ष् प्रकाशसिंह बादल, लोजपाचे अध्यक्ष् रामविलास पासवान, शिवसेना अध्यक्ष् उद्धव ठाकरे, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री राजनाथसिंह, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आदी यांनी शहांच्या उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एकाच मंचावरुन एनडीएची एकजूट दशर्वली. गांधी नगर सीट ही भाजपचा अभेद किल्ला मानला जातो. भाजपचे पूर्व अध्यक्ष् लालकृष्ण अडवाणी व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा गढ मानला जातो. अमित शहा हे गांधी नगर मधून त्यांच्या जीवनातील पहीली लोकसभा निवडणूक लढवित आहे.  यावेळी भव्य रॅली देखील काढण्यात आली होती.

याप्रसंगी भाषणात राजनाथसिंह यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच त्यांच्या मंत्रीमंडळातील एकाही नेत्यावर भ्रष्टाचाराचा एक ही डाग नसल्याचे सांगितले. देशाचा चौकिदार चोर नाही तर प्योर आहे. दुबार पीएम बनना श्‍योर है. मोदी यांच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असल्याचे ते म्हणाले. रामविलास पासवान यांनी अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजप आणखी मजबूत झाली असल्याचे सांगितले.शहा यांनी यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. दूसरीकडे विरोधकांचे गठबंधन हे आता लठबंधन झाले असल्याचे ते म्हणाले. भारताला आज मजबूर नाही मजबूत सरकारची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रकाशसिंह बादल यांनी शहा हे जमीनीशी जुळलेले कार्यकर्ते असल्याचे सांगितले. मोदी सरकारने जगात देशाचे नावलौकिक उंचावला. उद्धव ठाकरे यांनी गठबंधन सरकार चालवताना आमचे वैचारिक वाद नक्कीच झाले .मात्र ते मतभेद होते मनभेद नाही. हिंदूत्व आणि राष्ट्रीयत्व या एकच मुद्दााने गेल्या पंचवीस वर्षांपासून आम्हाला बांधून ठेवले आहे. अमित शहा हे घरी आले आणि वादाचे सगळे मुद्दे निकाली निघाले. जनहिताच्या मुद्दावरच आम्ही भांडलो. शिवसेनेचं हे चरित्र आहे तो पाठीत खंजिर खूपसत नाही जे काही आहे ते तोंडवर बोलून मोकळे होतो. आम्हाला बाळासाहेब यांनी हेच संस्कार शिकवले. आम्हाला देशील देशात मोदी हेच पंतप्रधान पदी पाहिजे. आज गर्दीमधून ‘मोदी-मोदी‘ ही जी घोषणा होतेय विपक्ष् गठबंधनाने जाहीर करावे त्यांचा पंतप्रधान कोण असणार आहे? विपक्ष् आजच पंतप्रधानाच्या नावाची घोषणा गर्दी मधून ऐकवू शकतो का?

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अमित शहा  यांनी सभेला सुरुवात केली.  त्यानंतर चार किमीचा भव्य रोड शो करत शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातीच आपला देश सुरक्षित राहू शकतो असं म्हणत पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. तसेच देशाचं नेतृत्व कोण करणार या एकाच मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माझ्या जीवनातून भारतीय जनता पक्ष वजा केल्यास मी शून्य म्हणून उरतो असे ते म्हणाले. ज्या लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व वाजपेयी आणि अडवाणी यासारख्या विभूत्तींनी केली ती क्षेत्रातुन मला उमेदवारी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो असे शहा म्हणाले.याप्रसंगी प्रकाशसिंग बादल मंचावर उपस्थित होताच शहा यांनी त्यांना वाकून नमस्कार केला तर उद्धव ठाकरे व सर्व उपस्थित घटक पक्षाच्या नेत्यांचे गळे मिळून स्वागत केले.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़