————————
विद्यार्थिनीसह दोघींचा विनयभंग
नागपूर. शहरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये एका विद्यार्थिनीसह दोघींचा विनयभंग केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. पहिल्या घटना सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान आरोपी तेजस पाटील (23, रा. मॉर्डन शाळेजवळ) याने शिकवणी वर्गातून जात पायदळ घरी जात असलेल्या 15 वर्षीय विद्यार्थीनीला रस्त्यात रोखले. पीडितेने त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष करून घराकडचा रस्ता घेतल्यानंतर संतापलेल्या तेजसने तिचा हात पकडून अश्लिल गैरवर्तन केले. यानंतर घाबरलेल्या पीडितेने कोराडी ठाणे गाठून तक्रार नोंदविली. सक्करदऱ्यातील दुसऱ्या घटनेत सोमवारी सकाळी दहाच्या दरम्यान पीडिता ही घरी हजर असतांना शेजारी राहणारा आरोपी सुलतान ताजी हनीफ ताजी याने अश्लिल हात वारे केले. यानंतर आरोपीने शेजारी राहणाऱ्या लहान मुलांच्या हाताने पीडितेला भेटण्याचे मेसेज पाठविले. यापूर्वी सुद्धा आरोपीने अश्याच प्रकारचे गैरवर्तन केल्याने कंटाळून पीडितेने सक्करदरा ठाण्यात तक्रार नोंदविली. या दोन्ही प्रकरणी कोराडी व सक्करदरा पोलिसांनी आरोपींताविरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur