
नागपूर: १७ व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशातील ९१ मतदारसंघात आज मतदान झाले आहे. यात विदर्भातील ७ मतदारसंघातील मतदारांनी आपले मतदान केले. गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील नक्षलग्रस्त भागात दुपारी ३:३० च्या सुमारास मत प्रकिया संपली. दुपारी ३.०० वाजेपर्यंत सातही मतदारसंघात सरासरी ४६.१३ टक्के मतदान झाले. ईव्हीएम यंत्रातील बिघाड, मतदांराच्या नावाचा घोळ अशा किरकोळ घटना वगळता सर्व मतदार संघामध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. दुपारी ३ पर्यंत ४४.५५ टक्के मतदानाची आकडेवारी उपलब्ध झाली होती.

नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ पासून मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणुकीसीठी एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ३० लाख मतदार आहेत. त्याच्यासाठी एकूण १५ हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान शांततेत पार पडावे म्हणून एकूण ११ हजारांवर सुरक्षादल तैनात करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील आजंती गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार; १ हजार ८९९ मतदारांपैकी ९३ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला.
भंडारा गोंदिया मतदारसंघ : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव हा परिसर नक्षलग्रस्त असल्यामुळे या ठिकाणी मतदानाची वेळ ३ वाजेपर्यंतच होती. मात्र, हा भाग वगळता इतर दुपारनंतर ग्रामस्थांची मोठी गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, कुठलीही अपरिचित घटना आतापर्यंत घडली नसून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती.
या लोकसभा मतदारसंघातून ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी आल्या
वर्धा – ६,रामटेक- ५,नागपूर-१२,यवतमाळ-वाशिम- ४,चंद्रपूर- ८गडचिरोली- ४ ,विदर्भातील ७ लोकसभा मतदारसंघात सुरु असलेल्या मतदानावेळी मतदान केंद्रावर ईव्हीएम बिघाडाच्या ३९ तक्रारी आल्या. काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.
लोकसभेच्या सात जागांसाठी विदर्भात पार पडलेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावरून ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वॉर रुमने जवळपास ५० तक्रारी ई-मेलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत.
मतदानावेळी ईव्हीएम मशिनचा वेग मंद असल्याने काही ठिकाणी एक मतदान करण्यासाठी चार-चार मिनिटे लागत होती. काही मतदान केंद्रात पुरेशा प्रकाशाची व्यवस्था केलेली नव्हती, तर काही मतदान केंद्रावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याच्या ५० हून अधिक तक्रारी काँग्रेसच्या वॉर रुमकडे आल्या. सर्वात जास्त तक्रारी या नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ मतदारसंघातून आल्या. या तक्रारी मुख्य निवडणूक आयुक्त, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त, यांच्याकडे पाठवण्यात आल्या तसेच पोलीस अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित शासकीय यंत्रणांना १०० पेक्षा जास्त फोन करुन या तक्रारींची माहिती देण्यात आली आहे.
नागपुरात मतदार यादीचा घोळ-
अनेक हयात नावे मतदार यादीतून गहाळ व अनेक हयात नसलेली यादीत असा अनुभव अनेकांना आला. पतीचे नाव मतदार यादीत होते मात्र पत्नीचे नाव यादीतून गेले आहे.हा गोंधळ प्रथमच अनुभवाला आला आहे. जवळपासच्या सहाही पोलिंग स्टेशनच्या याद्या पाहून झाल्यावरही ते कुठेच नाही.असा अनुभव अनेकांना येत असल्याचे सांगितले गेले.
…………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………..



८० वर्षांचे तरुण मतदार-
लोकशाहीप्रती आपले राष्ट्रीय कर्तव्य निभवण्यात ८० आणि ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे तरुण मतदार यांनीही कॅमेऱ्यांचे लक्ष वेधले. निवडणूक यंत्रणेने उपलब्ध करून दिलेल्या व्हील चेअर्सचा उपयोग ही अपंग व ज्येष्ठ नागरिकांनी केला. अतिशय उत्साहात मतदान करून बाहेर पडल्यावर त्यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांना असा पोझ ही दिला.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur