वर्तमान भाजपचे सरकार हे काँग्रेसचे पाप-ॲड.सुरेश माने

spot_img

नागपूर: काँग्रेसच्या शून्य कामगिरीमुळेच भारतीय जनता पक्ष् हे सत्तेच आले.वर्तमान भाजपचे सरकार हे काँग्रेसचेच पाप असल्याची घणाघाती टिका बहूजन रिपब्लिक सोशलिस्ट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष् ॲड.सुरेश माने यांनी रविवारी प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्र परिषदेत केला. काँग्रेसला दहा वर्ष देशातील जनतेने कौल दिला मात्र काँग्रेस पक्षाने  भ्रष्टचारी सरकार चालवली. पक्षाघात झालेली सरकार चालवली. निर्णयशून्य सरकार चालवली म्हणूनच देशाने मोदींना स्वीकार केले नाही तर गोध्रा हत्याकांडच्या पार्श्वभूमीवर मोदी निवडूण येणे शक्यच नव्हते. काँग्रेसच्याच काळात ओबीसी जणगणनेला मान्यता मिळाली नव्हती. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले असता कॉंग्रेसने हलफनामाच दाखल केला नाही,भाजपची सत्ता आल्यावर सर्वोच्च न्यायालयात या सरकारने आम्हाला ओबीसी जणगणनाच नको असा हलफनामा सादर केला मग नागपूरमधून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणारे आणि स्वत:ला ओबीसीचे नेते म्हणवणारे नाना पटोले हे ओबीसींचे नेते कसे? २००६ साली न्या.सच्चर यांनी सादर केलेला अहवाल कॉंग्रेसने कधी अमलातच आणला नही, परिणामी एकीकडे ‘सापनाथ‘ आणि दुसरीकडे ‘नागनाथ’अश्‍या परिस्थितीत देशातील जनतेने नागनाथाची निवड केली.
खरे सांगायचे तर राज्यात तर कॉंग्रेस पक्षाकडे नेतृत्वच नसल्याचे ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे ३४ टक्के मते आहेत तर भाजप आणि शिवसेनेकडे ४२ टक्के मते आहेत. आपली मतांची टक्केवारी ४० पर्यंत कशी पोहोचेल याविषयी काँग्रेसकडे संकल्पनाच नाही. मी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या तेव्हा संकल्पनांची ‘दिवाळखोरी’ माझ्या स्पष्टपणे लक्षात आल्याचे ते म्हणाले.शरद पवार, अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार,राजीव सातव इ.अनेक नेते तर निवडणूकच लढायला तयार नाहीत. ‘हा पक्ष् या निवडणूकीत भाजपाला हरवण्यासाठी गंभीरच नसल्याचा आरोप ॲड. माने यांनी केला. उलट भाजपला आपली मुले ‘दत्तक’ देऊन आणखी मजबूत करत आहेत. नागपूरात नानांनाही ‘ना’ ‘ना’ म्हणत तयार केले. गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी तसेच भारतीय ट्रायबल पक्ष्ाचे अध्यक्ष् व आमदार छोटूलाल मसावा यांनी नागपूरात मला पाठींबा जाहीर केल्याचे पत्र दिले असल्याची माहिती यावेळी ॲड.माने यांनी दिली.पत्र परिषदेत भारतीय पिछडा शोषित संगठन दिल्ली प्रदेशचे अध्यक्ष् अजयकुमार सिन्हा,प्रा.रमेश पिसे, झेड.आर.अवधूत, ॲड.शर्मा,राजेश बोरकर आदी उपस्थित होते. रिपब्लिकन मतांचे विभाजन होण्याची भीती बाळगून कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या मागे न जाता स्वत:च्या प्रबळीकरणावर लक्ष् केंद्रित करण्याचे आवाहन ॲड.माने यांनी केले.
नुकतेच नागपूरच्या लोकसभेतील उमेदवार नितीन गडकरी यांनी त्यांचा वचननामा जाहीर केला,२०१४ मध्येही भाजपचे घोषणापत्र जाहीर झाले होते.त्यात प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्‍वासन होते .काँग्रेसपक्षाने देखील या निवडणूकीत ही आपले घोषणापत्र जाहीर करुन गरिबांच्या खात्यात ७२ हजार रुपये जमा करण्याचे आश्‍वासन दिले. हे घोषणापत्र म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळून त्यांच्या मतांची लृट करणे होय. घोषणा पत्र कोणत्याही पक्षाची असो जनतेप्रति त्याची बांधिलकी असावी असे पत्र आम्ही निवडणूकांपूर्वी केंद्रिय निवडणूक आयोगाकडे दिले आहे. घोषणापत्रप्रमाणे कारभार न करणाऱ्या पक्षावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी आम्ही आयोगाकडे केल्याची माहिती ॲड.सुरेश माने यांनी दिली. सुशिक्ष्तिांनी वंचिताचा आवाज होण्याचे आव्हान यावेळी सिन्हा यांनी केले. जगात जिथे जिथे लोकशाही आहे तिथे तिथे चांगला-वाईट काळ त्या देशांनी भोगला मात्र जगाच्या इतिहासात भारत हा ऐकमेव असा देश आहे जिथे फारच वाईट काळाला ‘अच्छे दिन’ म्हणून संबोधिले गेले. खरोखर अच्छे दिन हवे असल्यास डॉ.माने यांच्यासारख्या सुशिक्ष्िात आणि अभ्यासू उमेदवाराला संसेदत पाठवण्याचे आव्हान त्यांनी केले. भाजपच्या सरकारने तर संसदेत निवडणूक खर्चाचा हिशेब न देण्याचा कायदाच संसदेत पारित केला असून त्याला कॉंग्रेसनेही पाठींबा दिला असल्याची माहिती सिन्हा यांनी दिली. या कायद्याचा विरोध करण्याचे त्यांनी आवाहन दिले.

राहूल गांधींना आंबेडकवाद्यांचे मेल-
२००६ मध्ये खैरलांजी घडले. या घटनेचा नाना पटोले यांच्या ‘छावा संग्राम परिषदेने’ जातीयवादासाठी उपयोग केला. २००७ साली अशीच एक घटना ओबीसी समाजाच्या अंकिता लांजेवार या दूर्देवी मुलीसोबत घडली. गुन्हेगारीला जात नसते मात्र या ही घटनेत आरोपी हा अनुसूचित जातीचा असल्यामुळे छावा संघटनेने राण पेटवले. आजही पटोले यांच्या गावात छावा संग्राम परिषदेने बौद्ध समाजावर सामाजिक बहिष्कार घातल्याचा आरोप ॲड.माने यांनी केला. अश्‍या उमेदवाराला उमेदवारी देऊ नका असा मेल राहूल गांधींना येथील आंबेडकरवाद्यांनी केला होता मात्र ऐकेल ती काँग्रेस कसली? बहूजन समाज या निवडणीत पटोले यांच्या विरोध करणार असल्याचे चित्र स्पष्ट अाहे. पटोले हे अविश्‍वासहार्य असून दर वेळी पक्ष् बदलतात, भविष्यात ते भाजपमध्ये जाणार नाही याची काहीच भरवसा नसल्याची टिका ॲड.माने यांनी केली. भाजप आणि संघाच्या विरोधात लढण्यासाठी ते सक्ष् म उमेदवार नसल्याचे ते म्हणाले.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़