
मुंबई: मी स्टार म्हणून ही निवडणूक लढवीत नाही. आपल्या लोकशाहीमध्ये संपूर्ण जनता हीच खरी स्टार आहे. मी काँग्रेसची विचारधारा घेऊन ही निवडणूक लढणार आहे. एक चांगला विचार घेऊन मी ह्या क्षेत्रात उतरलेली आहे. ऊर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, त्या मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आता त्यांच्यावर भाजपा नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. त्यावर ऊर्मिला यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी मुंबईकर आहे’ आणि याआधीही होती आणि यापुढेही राहणार आहे, याबाबत मला कोणालाही प्रमाणपत्र देण्याची गरज नाही असंही ऊर्मिला मातोंडकर म्हणाली आहे.
मला कोणावरही आरोप करायचे नाही आहे. मुंबईमध्ये उत्तर मुंबई हा एक खूप चांगला आणि सुंदर विभाग बनवून दाखवायचा आहे. मला ही निवडणूक प्रेमाने आणि मोठ्या मनाने लढवायची आहे, द्वेषाचे राजकारण मला करायचे नाही. निवडणुकीनंतरही मी काँग्रेस पक्षासोबत असणार आहे, असे उद्गार उत्तर मुंबईतील काँग्रेसची उमेदवार आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी आज बोरिवलीमध्ये काढले.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur