राधाकृष्ण विखे पाटलांनी निषेध करायला हवा होता-बाळासाहेब थोरात

spot_img

विखे घराण्याचे वागणे अहमदनगरच्या जनतेलाही आवडणार नाही, असे थोरात म्हणाले. काँग्रेस पक्षाने आतापर्यंत विखे कुटुंबीयांना भरभरुन दिले. मागेल ती पदे दिली. ही वेळ पक्षाला उतराई होण्याची होती. मात्र, पुत्रहट्टापुढे विखे पाटील झुकले. त्यांनी मुलाला समजून सांगायला हवे होते. त्याला रोखायला हवे होते. . पक्ष सांगेल ते मी करेल, असे विखे म्हणतात. पण, ते मुलाला रोखण्यात अपयशी ठरले. याचे स्पष्टीकरण त्यांना द्यावे लागेल. ते आता काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे, असे थोरात यांनी सांगितले. विखे राजीनाम देऊन भाजपमध्ये गेले तर तुम्ही विरोधी पक्षनेतेपद स्वीकाराल काय, असा प्रश्न वार्ताहरांनी विचारला. त्यावर थोरात म्हणाले, की पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी आजवर इमानेइतबारे सांभाळली आहे. यापुढेही सांभाळेल.
काँग्रेसकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळाली नसल्यामुळे डॉ. सुजय विखे-पाटलांनी मंगळवारी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे. त्यानंतर सुजयचे वडील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची पुढील भूमिका काय असणार, याबद्दल राज्यात सर्वत्र उत्सुकता आहे. त्याबरोबरच काँग्रेसकडून त्यांच्यावर कोणती कारवाई होऊ शकते का? याबद्दलही तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राधाकृष्ण विखे-पाटील हे पदाचा राजीनामा देतात की पक्षात राहतात, की भाजपमध्ये प्रवेश करणार याबद्दल मोठी उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे. काल रात्रीपर्यंत राधाकृष्ण विखे हे दिल्लीमध्ये तळ ठोकून होते. रात्री उशिरा ते लोणीमध्ये आले. त्यानंतर नगर मार्गे तुळजापूरकडे जाताना त्यांनी नगरमध्ये मोजक्या लोकांशी चर्चा केली. या चर्चेत विखे यांनी आपण आपली भूमिका येत्या २ दिवसात स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर काही माध्यमांमध्ये माझ्या राजीनाम्याच्या येणाऱ्या बातम्या या चुकीच्या आहेत. काहींना माझ्या राजीनाम्याची घाई झाली असल्याचा टोला त्यांनी  राजकीय विरोधकांना लगावला. त्यामुळे आता विखे-पाटील येत्या २ दिवसात आपली कोणती पुढील दिशा ठरवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आपली भूमिका येत्या २ दिवसात माध्यमांसमोर स्पष्ट करू-राधाकृष्ण विखे पाटील
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (बुधवारी) अहमदनगर येथे अनौपचारिक बोलताना विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला नसल्याचे सांगितले. त्याबरोबरच याबाबतची आपली भूमिका येत्या २ दिवसात माध्यमांसमोर स्पष्ट करू, असे सांगितले.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़