राज्यात महाआघाडीत धुसफुस

spot_img

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या विरोधात आकाराला येऊ घातलेल्या महाआघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. समाजवादी पक्षाने आघाडीकडे लोकसभेच्या एका जागेची मागणी केली असून, ती मान्य न झाल्यास महाराष्ट्रात १० जागा लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

काँग्रेसने युतीच्या विरोधात महाआघाडी उभी करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेत प्राथमिक चर्चा केली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील लोकसभेच्या जागांच्या वाटपाबाबत दोन्ही काँग्रेसमध्येच चर्चा सुरू आहे. नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात चर्चा झाली. मात्र, दोन्ही नेते छोट्या पक्षांना विश्वासात घ्यायला तयार नसल्याने या पक्षांमध्ये असंतोष आहे.

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी बुधवारी मुंबईत राज्य कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी समाजवादी पक्षाची आघाडी ही राष्ट्रवादीसोबत असल्याचे स्पष्ट केले. महाआघाडीने समाजवादीला लोकसभेची एक जागा द्यावी. यासंदर्भात लवकर निर्णय झाला नाही, तर तर आपला पक्ष मुंबईसह उर्वरित ठिकाणी दहा जागा लढेल, असे आझमी यांनी सांगितले.

‘आप’ राज्यात लढणार
आम आदमी पक्ष महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ‘आप’चे राज्य समन्वयक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज केली. ज्या मतदारसंघात सक्षम उमेदवार व ताकद आहे, असे मतदारसंघ पूर्ण क्षमतेने लढवण्याचा निर्णय ‘आप’ने घेतला आहे. बहुतांश शहरी भागातील मतदारसंघांवर ‘आप’ने लक्ष्य केले असून, अनेक माजी सनदी अधिकारी, युवा चेहऱ्यांना उमेदवारी देण्याचा अंदाज आहे.

‘आप’ने राज्यभरात गाव व तालुका समित्या स्थापन करण्यावर भर दिला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १२ जानेवारी २०१७ ला सिंदखेड राजा येथे जाहीर सभा घेत आम आदमीची महाराष्ट्रात एन्ट्री करण्याचे जाहीर केले. त्यानंतर स्थानिक समित्या स्थापन करून राज्यातील पदाधिकाऱ्यांची नेमणूकदेखील पक्षाने पूर्ण केली आहे. ‘आप’च्या वतीने निवडणूक लढवण्यास इच्छुकांनी ३० जानेवारीपर्यंत पक्षाकडे अर्ज दाखल करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. महाराष्ट्रात ‘आप’ आघाडी करण्याच्या प्रयत्नात असून, पाच फेब्रुवारीला या नव्या आघाडीची घोषणा करण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात आले.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़