
नागपूर : लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ मंगळवारी नागपूरच्या रणरणत्या उन्हात माजी केंद्रीय मंत्री उमा भारती मैदानात उतरल्या. मंगळवारी त्यांनी तीन सभांना संबोधित केले. पहिल्या सभेत त्यांनी लोधी समाजाला एकत्रित करून गडकरी यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी नितीन गडकरी हे माझे भाऊ असल्याचे म्हटले आहे.
माझ्या आयुष्यात मला राजमाता सिंधिया व गडकरी यांनीच सावरले. त्यामध्ये पहिले नाव राजमाता सिंधिया यांचे आहे. यावेळी त्यांनी लोधी समाजातर्फे आयोजित सभेत गडकरी यांना मतदान करा, मी लोधी समाजाची मुलगी आहे, त्यामुळे त्यांना मिळणारे प्रत्येक मत माझ्या पारड्यात पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीत एनडीएला खंडित बहुमत मिळाल्यास गडकरी पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार असतील का? यावर त्या म्हणाल्या, हा वाद उपस्थित करणे मुळातच चुकीचे आहे. नरेंद्र मोदी यांना देशाने आपले पंतप्रधान म्हणून निवडले आहे. याशिवाय काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरदेखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसला सत्तेत परतण्याची कोणतीही इच्छा नसल्याने त्यांनी, अशा प्रकारचा जाहीरनामा तयार करून प्रसिद्ध केला असल्याचे त्या म्हणाल



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur