
नागपूर: माझ्या पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी पक्षाचे आभार मानतो, मागच्या पेक्षा जास्त मताधिक्याने मी निवडून येणार आहे,गेल्या ५ वर्षात जेवढे काम केले त्यापेक्षा जास्त काम करून दाखवेन,नागपूरच्या जनतेचा मला जेवढे समर्थन मिळाले होते त्यापेक्षा अधिक समर्थन मला मिळणार आहे असा विश्वास माध्यमांना प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला तसेच केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वातील भाजपचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. गुरुवारी रात्री गडकरी यांची अधिकृत उमेदवारी घोषित झाली तेव्हा नागपूरकरच नव्हे तर महाराष्ट्रतील जनतेचे लक्ष नागपूरच्या सीट कडे होते.
दिल्लीत भाजपने १८४ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी घोषित केली त्यात १६ नावे महाराष्ट्रातील उमेदवारांचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा ‘माँ गंगा’ च्या सानिध्यात वाराणसी मधून तर भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा हे स्वतः गुजरातच्या गांधी नगर मधून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले. स्मृती इराणी या राहुल गांधींच्या विरोधात अमेठीत शड्डू ठोकणार आहे तर नुकतेच पक्षांतर करून भाजप मध्ये प्रवेशित झालेले डॉ.सुजय विखे पाटील यांची देखील उमेदवारी घोषित झाली. सर्वात महत्वाची घडामोड म्हणजे पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे नाव पहिल्या यादीत नाही. किरीट सौम्यया यांचे देखील नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे शिवसेनेचा कडवा विरोध सौम्यया यांना असल्यामुळे त्यांचे नाव गुलदस्त्यात असल्याची चर्चा आहे.
चंद्रपूरवरून अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झालेले केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहीर यांनी ‘जनतेचा विश्वास असल्याशिवाय जिंकू शकत नाही,उमेदवारी मिळाली ती जिंकण्यासाठीच, जनताच मला पुन्हा विजयी करेल ‘ असा विश्वास व्यक्त केला.
भाजपच्या पहिल्या यादीमुळे अनेकांची धुळवड बेरंग झाली तर अनेकांच्या लढती पक्क्या झाल्या. नागपूरची लढत ही गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी रंगणार हे निश्चित झाले तर येणारा आठवडा महाराष्ट्रत आणखी गाजणार असल्याचे सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ‘Incoming’ अशीच सुरू राहिली तर लढणार कोणाविरुद्ध असा सवाल शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही नागपूरच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मनोमिलन मेळाव्यात केले होते,पवारांना घेऊ नका अशीही मिश्किली त्यांनी केली होती.
भाजपचे 16 उमेदवार जाहीर
नंदुरबार – हीना गावित
धुळे – सुभाष भामरे
रावेर- रक्षा खडसे
अकोला – संजय धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
गडचिरोली-चिमुरी – अशोक नेते
चंद्रपूर- हंसराज अहिर
जालना – रावसाहेब दानवे
भिवंडी – कपिल पाटील
मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी
मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन
अहमदनगर – सुजय विखे पाटील
बीड – डॉ. प्रीतम मुंडे
लातूर – सुधाकरराव शिंगारे
सांगली – संजयकाका पाटील



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur