
नागपूर: महापालिकेने बँक ऑफ महाराष्ट्र कडून २०० कोटींच्या नवीन कर्जाच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या मंजुरी नंतर मंगळवारी दि. ५ मार्च २०१९ रोजी महासभेत मंजुरीसाठी विचारात घेण्यात आला मात्र यातील ५० कोटी रुपये पुन्हा ‘ओसीडब्लयुला’ देण्याचा विरोधात, विरोधकांनी सभागृह दणाणून टाकले. २०१७ सालीच ओसीडब्ल्यूला १५ कोटी ७८ लाख रुपये देण्यात आले तरीदेखील शहराची पाण्याची व्यवस्था सुधारली नाही असा आक्षेप घेत प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी ही संपूर्ण रक्कम फक्त विकास कामांसाठीच वापरावी अशी मागणी करून या पूर्वी देखील महापालिकेने ५०० कोटींचे कर्ज बँक ऑफ महाराष्ट्र कडून घेतले असून शेवटी या संपूर्ण कर्जाचा बोजा नागरिकांवर पडत असल्याचे निदर्शनास आणले. एकीकडे नगरसेवकांना प्रभागातील विकास कामांसाठी पैसा मिळत नाही दुसरीकडे ‘गल्ली ते दिल्ली’ पर्यंत भाजपाचीच सरकार असल्यामुळे त्यांच्याकडे अनुदान मागावे अशी मागणी हरीश ग्वाळवंशी यांनी केली. नगरसेवक संदीप सहारे यांनी एकीकडे मनपा कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्यामुळे ते ‘मुंडण’ आंदोलन करतात दुसरीकडे ठेकेदारांचे पैसेही मिळत नसल्यामळे तीव्र आंदोलने झालीत,जेव्हा तुम्ही कर्मचारी आणि ठेकेदार यांचे लाड पुरवत नाही मग ओसीडब्ल्यूचे लाड कसे पुरवता, असा प्रश उपस्थित केला. बँक ऑफ महाराष्ट्र कडून यापूर्वी ५०० कोटींचे जे कर्ज घेण्यात आले त्यावरील मंजूर व्याजेपेक्षा कितीतरी पटीने जास्त व्याज बँक ऑफ महाराष्ट्रने वसूल केले ज्याची सभागृहानेही ऑडिट आक्षेप नोंदवला होता,तरीदेखील पुन्हा त्याच बँकेकडून पुन्हा २०० कोटींचे कर्ज का घेण्यात आले असा प्रश्न सहारे यांनी उपस्थित केला. तर कर्ज घेण्यासाठी जाहिरात का काढली नाही, इतर कोणत्या बँकेकडे कर्जासाठी विचारणा केली होती का?असा प्रश्न नगरसेवक मनोज सांगोले यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना प्रशासनाने,यापूर्वीही महापालिकेने बँक ऑफ महाराष्ट्र कडूनच कर्ज घेतले असल्याचे सांगून नवीन कर्जासाठी या बॅंकेनी कोणतीही गॅरंटी मागितली नसून क्रेडिट रेटिंगमध्येही सहकार्य केल्याचे सभागृहात सांगण्यात आले. ५० कोटी ओसीडब्ल्यूला देण्यापेक्षा कायसमस्वरूपी बंधारे बांधण्यासाठी तो पैसा खर्च करावा,जी कंपनी २४/७ योजना यशस्वीपणे राबऊ शकली नाही अश्या कंपनीला पुन्हा कर्ज न देता नवीन यंत्रणेवर खर्च करण्यात यावा अशी मागणी विरोधकांनी केली.सदर कर्जाच्या रकमेतून बुधवार बाजार,सक्करदार बाजार विकासासाठी २५ कोटी, मेट्रो मॉल, ऑरेंज सिटीसाठी २५ कोटी,अमृत योजने अंतर्गत विकास कामांसाठी तसेच सिमेंट रस्ते निधीसह, ओसीडब्ल्यूला ५० कोटी रक्कम देण्याचा विषय सभागृहातर्फे मंजूर करण्यात आला.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur