ब्रम्होसची माहिती लिक करणारा निशांत अग्रवाल गजाआड

spot_img

नागपूर: ब्रह्मोस क्षेपणास्त्रासंबंधीची माहिती पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला लीक केल्याच्या संशयातून अटक करण्यात आलेला वैज्ञानिक निशांत अगरवाल याची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याला सीक्रेट यार्डमध्ये ठेवण्यात आले असून, कारागृह प्रशासनाची त्याच्यावर करडी नजर आहे.

ऑक्टोबर २०१८ मध्ये उत्तर प्रदेशच्या एटीएसने नागपुरातील उज्ज्वलनगर येथे छापा टाकून निशांत याला अटक केली होती. एटीएसच्या पथकाने त्याच्या घराची झडती घेऊन लॅपटॉपसह अन्य साहित्य जप्त केले होते. याशिवाय एसटीएसच्या पथकाने नागपुरात ब्रह्मोस एअरोस्पेस सेंटरमधील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली होती. आयएसआयने ‘हनीट्रॅप’द्वारे त्याला जाळ्यात अडकविले होते. त्याच्याकडून ब्रह्मोसची माहिती घेतली होती. हनीट्रॅप द्वारे भारतीय शास्त्रज्ञांनी शत्रू राष्ट्राला माहिती पुरविल्याचे कळताच एसटीएसच्या पथकाने नागपुरात छापे टाकले होते. निशांतला अटक करून लखनौ येथे नेले. तेथे तब्बल सहा महिने एटीएसच्या पथकाने त्याची कसून चौकशी केली. या प्रकरणात एका महिला वैज्ञानिकासह हैदराबाद येथील वैज्ञानिकाचेही नाव समोर आले होते. शुक्रवारी सायंकाळी निशांत याला मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. त्याला सीक्रेट यार्डमध्ये ठेवण्यात आल्याच्या वृत्ताला कारागृह प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़