प्रकृती अस्वस्थामुळे ६ घटनेत ६ जणांचा मृत्यू

spot_img

प्रकृती अस्वस्थामुळे ६ घटनेत ६ जणांचा मृत्यू
नागपूर : सोनेगाव, यशोधरानगर, गिट्टीखदान, मानकापूर, शांतीनगर पोलीसठाण्याच्या हद्दीत घडलेल्या पाच घटनेत
प्रकृती अस्वस्थामुळे ५ जणांचा मृत्यू झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत सोनेगाव हद्यीतील सीआरपीएफ कॅम्प, नागपूर येथे राहणारे सुभाष
भत्तुजी वासनीक (४०) यांची २२ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास प्रकृती खराब झाल्याने त्यांना
उपचाराकरीता मडीकल हॉस्पीटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.
दुसऱ्या घटनेत यशोधरानगर हद्यीतील बिनाकी मंगळवारी, पोळा मैदान, नागपूर
येथे राहणाऱ्या बबीता विजय बिकेकर (३४) यांची १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास प्रकृती खराब झाल्याने त्यांना उपचाराकरीता मेडीकल
हॉस्पीटल येथे भरती केले होते. उपचारादरम्यान २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून
मृत घोषीत केले.
तिसऱ्या घटनेत यशोधरानगर हद्यीतील विनोबा भावे नगर, नागपूर येथे राहणारे अजय प्रभाकरराव निंबाळकर (३६)
यांची २१ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास अचानक प्रकृती खराब झाल्याने त्यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल
येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.
चवथ्या घटनेत गिट्टीखदान हद्यीत विश्वास नगर, नागपूर येथे राहणारे
दयासिंग नारायण कसोरिया (५१) यांची २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घरी प्रकृती खराब झाल्याने त्यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.
पाचव्या घटनेत मानकापूर हद्यीत प्रादेशिक मनोरूग्णालय, नागपूर येथे उपचार घेत असलेली सावित्री इनवते (५३) यांची
१४ फेब्रुवारी रोजी प्रकृती खराब झाल्याने त्यांना उपचाराकरीता मेडीकल हॉस्पीटल येथे भरती करण्यात आले होते, पण
२२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून
मृत घोषीत केले. सहाव्या घटनेत शांतीनगर हद्यीतील शांतीनगर घाट चौक, नागपूर येथे राहणारे
श्रीराम पिलाजी घुगल (५४) यांची २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.५० वाजताच्या सुमारास प्रकृती खराब झाली असता त्यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी सहाही घटनेत मिळालेल्या सुचनेवरून सोनेगाव, यशोधरानगर,
गिट्टीखदान, मानकापूर, शांतीनगर पोलिसांनी
अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
—————–

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़