परिर्वतन घडल्याशिवाय राहणार नाही-अशोक चव्हाण

spot_img

नांदेड: आज देशात वा राज्यात जे वातवारण आहे ते विद्यमान सरकारच्या विरोधात आहे. शेतकरी,व्यापारी, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्‍न,कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर आहे. संपूर्ण देशात असंतोष मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. मतपेटीतून जनता आता हा असंतोष,हा उद्रेग व्यक्त करील. लोकांच्या आतमध्ये जो उद्रेग दडला आहे निश्‍चितपणे देशात आणि राज्यात परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नसल्याचे विधान माजी मुख्यमंत्री व नांदेड मधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अशोक चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी आज नांदेड येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते कमलकिशोर कदम, बापुसाहेब गोरठेकर यांच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीतील मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते.नांदेडच्या जिल्हधिकारी कार्यालयात त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला.याप्रसंगी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले,की राज्यामध्ये काँग्रेस पक्ष् पूर्ण ताकदीने लढा देत आहे. साम,दाम,दंड,भेद करणारे आज दुसरीकडे आहेत. त्यांच्यासमोर लोकशाही मार्गाने,खर या अर्थाने लोकांच्या अार्शिवादाने लढत देण्याकरीता काँग्रेस पक्ष् सज्ज झाला आहे. प्रतीक पाटील यांच्या राजीनाम्याचा प्रश्‍नावर उत्तर देताना चव्हाण म्हणाले की सगळ्याच ठिकाणी सगळ्यांच्याच मनासारखे होत नसतं, प्रयत्न आमचा चालला होता. कॉंग्रेसकडे मागणी भरपूर उमेदवारांची आहे .त्यामुळे काही ठिकाणी थोडासा असंतोष होणे स्वाभाविक आहे. पण लवकरच हा असंतोष क्ष् मेल, प्रश्‍न मार्गी लागतील. पाटील यांच्याशी संपर्क करतोय, आघाडीमध्ये सर्वच मित्र पक्ष्ां ना सोबत घेऊन चलावं लागतं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहूजन विकास आघाडी, बाकि रिपब्लिक पक्ष् ाचे अनेक सहकारी, शेकाप इत्यादी असे आठ ते दहा पक्ष् तसेच ५६ संघटनांची मूठ आम्ही बांधली आहे त्यामुळे निश्‍चितच आम्ही यशस्वी होऊ. यशाची आम्हाला खात्रीच आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू व काँग्रेसचे माजी केंद्रिय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून यापुढे कोणत्याही राजकारणात भाग घेणार नसल्याचे जाहीर केले. पक्ष् ाने सांगलीतून बंधू विशाल पाटील यांना उमेदवारी दिली तर ठिक आहे नाही तर बंधू अपक्ष् लढतील असे प्रतीक पाटील यांनी जाहीर केले आहे.
चंद्रपूरप्रमाणेच औरंगाबादमध्येही बदल घडून येईल का?या प्रश्‍नावर अब्दूल सत्तार यांना उमेदवारी देऊ केली होती,शेवटी निर्णय त्यांनाच घ्यायचा असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तुमची ईच्छा असेल तर माघार ही घेऊ शकतो असे देखील चव्हाण यांनी बोलल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अब्दूल सत्तार यांनी भेट घेतली असली तरी भाजपमध्ये जाण्याचा माझा कोणताही विचार नाही, असं सांगतानाच येत्या शुक्रवारी २९ मार्च रोजी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पुढील निर्णय घेण्यात येईल, असं काँग्रेसचे बंडखोर नेते  अब्दूल सत्तार यांनी आज स्पष्ट केलं.

 

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़