पटोलेंनी माहिती तपासून घ्यावी- सुधाकर देशमुख यांचे आव्हान

spot_img

 

नागपूर: नितीन गडकरी यांनी कुठलीच विकासकामे केली नाही असा आरोप नाना पटोले यांनी केला. गडकरींच्या कामांची विचारण कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे करावी तसेच गडकरी यांनी केलेल्या सर्व विकास कामांचा तपशील उपलब्ध आहे,पटोले यांनी माहिती तपासून घ्यावी अशा शब्दात आमदार सुधाकर देशमुख यांनी पटोले यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

शनिवार दि.१६ एप्रिल रोजी भाजपतर्फे नागपूर लोकसभा निवडणूक संचलन समितीची पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. याप्रसंगी देशमुख यांनी नाना पटोले यांनी गडकरी यांच्यावर केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लीकार्जून खरगे यांनी भर संसदेत नितीन गडकरी यांच्या कामांचे कौतुक केले होते. आता कॉंग्रेसचेच उमेदवार नाना पटोले हे नितीन गडकरींच्या कामावर टीका करीत आहेत. प्रत्यक्षात नितीन गडकरी यांनी नागपूरसाठी आणलेला निधी व कामांचा लेखाजोखा उपलब्ध आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे मिहान, मेट्रो, नॅशनल हायवेसह अन्य प्रकल्पांमुळे निर्माण झालेल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराचीही विस्तृत माहिती उपलब्ध असून, पटोलेंनी ही माहिती तपासून घ्यावी, असे आव्हान त्यांनी केले. पत्रकार परिषदेला आमदार प्रा. अनिल सोले, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, संदीप जोशी व माजी महापौर प्रवीण दटके उपस्थित होते.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़