नागपूर शहरातील 2000 दिव्यांग व्यक्तींना घरपोच मिळणार स्मार्ट कार्ड

नागपूर महानगरपालिका नागपूर,समाज कल्याण, अपंग कल्याण विभाग आणि जिल्हा अपंग पुनवर्सन केन्द्र, नागपूर हा प्रकल्प शहरी भागातील अपंग व्यक्तींना त्यांच्या संपूर्ण विकासासाठी, पुनर्वसनासाठी व प्रषिक्षणासाठी कार्य करते. केंद्र शासनाच्या निःसमर्थ (दिव्यांग) व्यक्ती हक्क अधिनियम, दि. 27.12.2016 पासून लागू झाालेला आहे या धोरनात्मक निकषाची प्रत्यक्षात अमंलबजावणी करण्यासाठी अपंग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी गरजेनुसार वैद्यकिय पूनर्वसनात्मक सहायभूत सेवा विहित कालावधीत मिळाव्यात याकरिता विविध पूनर्वसनात्मक कार्यक्रमाचे आयोजन उपरोक्त संदर्भानुसार करणे आवश्यक आहे.
यानुसार विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींजवळ अपंगत्वाचे वैद्यकिय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूर शहरातील दिव्यांग बांधवांना आयआरसीटीसीद्वारे रेल्वे प्रवास सवलत ई.तिकीट या सुविधेचा लाभ देण्याकरिता भारतीय रेल्वे विभागामार्फंत देशातील सर्व दिव्यांग बांधवांकरिता त्यांच्या प्रवर्गानुसार व अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार रेल्वे प्रवास टिकीट सवलती व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या स्मार्ट कार्ड मार्फत दिव्यांग व्यक्तींना प्रवासादरम्यान होणारे फायदे
1. दिव्यांग व्यक्तीना आॅनलाईन टिकीट सुद्धा सवलत दरात प्राप्त होईल.
2. दिव्यांग व्यक्तीना टिकीट काढण्याकरीता रांगेत उभे रहावे लागणार नाही.
3. दिव्यांग व्यक्तींना प्रवासादरम्यान फक्त या स्मार्ट कार्डच सोबत न्यावे लागतील.
4. भारतीय रेल्वे प्रशासनामार्फत देण्यात येणा-या प्रवास सवलतीचा फायदा दिव्यांग बांधवांना होईल.
5. इतर कुठल्याही कागदाचे किंवा दस्ताऐवजाची गरज भासणार नाही.
त्याकरिता दिव्यांग व्यक्तींना भारतीय रेल्वे प्रशासनामार्फंत सुरू करण्यात आलेले यूनिक आयडी कार्ड (आयआरसीटीसीद्वारे सवलत आधारित ई.तिकीट) योजनेचा लाभ घेण्याकरिता खालील बाबींची पूर्तता करणे अनिवार्य होते.
1. रेल्वे सवलतीसाठी शारीरीकदुष्टया अपंग व्यक्तींनी नागपूर मध्य रेल्वे मुख्य कार्यालय
रेल्वे स्टेशन येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक ;क्त्डद्ध कार्यालयाशी सर्व संबंधित कागदपत्रांसह जसे वैघकीय रेल्वे सवलत प्रमाणपत्र, छायाचित्र ओळख पूरावा, जन्माचा पूरावा, पत्त्याचा पूरावा, आणि दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, रेल्वे फोटो ओळखपत्र मिळविण्याकरिता संबंधित कागदपत्रांच्या एक छायाकिंत प्रत संच प्रमाणित (स्वंय प्रमाणित) करून स्वतः किंवा पोस्टाने सादर करावा लागतो.
2. विभागीय रेल्वे व्यवस्थापक; कार्यालयाला सवलत प्रमाणपत्र, ओळखपत्र प्राप्त
होईल, व्यावसायिक निरिक्षकाकडून या प्रमाणपत्र, ओळखपत्रांची तपासणी केली जाईल, प्रमाणपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी ज्यांनी प्रमाणपत्र दिलेले असेल अशा रूग्णालयांशी संपर्क साधला जाईल/भेट देण्यात येईल. कार्ड निर्गमित होईपर्यंत एकूण प्रक्रिया अर्जाच्या प्राप्त होण्याच्या तारखेपासून तीन महीन्यात मुदतीत पूर्ण करण्यात येते.
3. सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर विहित नमून्यातील एक फोटो ओळख कार्ड,
ज्यामध्ये एक यूनिक आयडी क्रमांक असेल तो वरिष्ठ डी.सी.एम. अधिकाÚयाच्या हस्ताक्षर केल्यांनंतर दिला जाईल आणि याचा सर्व तपशील आरपीएफ डेटाबेसमध्ये नांेद केल्यानंतरच स्मार्ट कार्ड वाटप केले जाईल.
4. हा संपूर्ण कालावधी 90 दिवसांपेक्षा जास्त असल्यामूळे दिव्यांग बांधवांना शहर
पातळीवरील इथे येण्याजाण्यास गैरसोय होत असल्यामूळे बहूतांश दिव्यांग बांधव या चांगल्या योजनेपासून वंचित राहत असल्यामूळे तसेच वरील अशा सर्व अटि शर्ती पूर्ण करून दिव्यांग बांधवांना हे यूनिक कार्ड प्राप्त करून घेण्यास अडचणी होत असल्याचे निर्देशनास आले . त्यामूळे त्या दस्ताऐवजाच्या आधारे रेल्वे विभागामार्फंत ई.तिकीट प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur