नागपूरात गडकरींच्या विरोधात कोण?

spot_img

नागपूर: महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरात ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून हेविव्हेट नेते नितीन गडकरी यांचा हा गड मानला जातो. गडकरी यांनी गेल्या काही वर्षात त्यांचा मतदार संघ असणाऱ्या नागपूरात विकास कामांचा झपाटा लावला असून अनेक कोट्यवधी रुपयांचे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी नागपूरात आणले असून त्यांच्याच प्रयत्नातून नागपूर ही आता मुंबई- पुणे प्रमाणे ‘मेट्रो सिटी’ झाली आहे.
एम्स, आयआयटी, आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिम्बॉसिस सारखी नावाजलेली शैक्षणिक संस्था नागपुरात खेचून आणण्याचे श्रेय गडकरी यांना जातं. नागपूरात या हेव्हीव्हेट नेत्याच्या विरोधात लढण्याचे सामर्थ्य सध्यातरी विरोधकांमध्ये नाही. आपला मतदार संघ गडकरी यांनी मजबूत बांधला आहे. जरी ते दिल्लीला राहत असले तरी आपल्या मतदारसंघाशी त्यांनी नाळ मजबूत ठेवली. सध्या त्यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा असून दुसरीकडे विकास ठाकरे, बबनराव तायवाडे, प्रफुल्ल गुडधे पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. थोडक्यात नितीन गडकरी यांच्या विरोधात विपक्ष कोणता तगडा उमेदवार देतो याकडे नागपूर आणि विदर्भच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

नितीन गडकरी भाजपचे सर्वाधिक प्रभावशाली नेते नेते मानले जातात. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी देखील गडकरी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पर्याय मानले असून त्यांच्या विषयी काळजीही व्यक्त केली होती. पवार यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पवार यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय अशी चर्चा सुरू झाली. लोकसभेच्या निवडणूकित गडकरींची भूमिका याकडे नागपूर किंवा विदर्भच नव्हे तर देशाचंच लक्ष लागलं आहे. काँग्रेसच नव्हे तर सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांशी नितीन गडकरींचे मधुर संबंध आहेत. नितीन गडकरींची वक्तव्यं यामुळे बरेचदा वाद ही त्यांनी ओढवून घेतले. गडकरी यांची लोकप्रियता पाहता सध्या भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर प्रचारसभेसाठी नेता म्हणून गडकरी यांनाच जास्त मागणी असून तेच भाजपसाठी ‘स्टार’ प्रचारक राहतील असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़