गडचिरोली,दि.७: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विसामुंडी येथील एका युवकाची हत्या केली. आनंदराव संतु मडावी(३२) असे मृत युवकाचे नाव आहे.बुधवारच्या(दि.६)रात्री सशस्त्र नक्षली आनंदरावच्या गावी गेले. त्यांनी त्याला झोपेतून उठवून बाहेर नेले आणि गळा चिरुन हत्या केली. आज सकाळी त्याचा मृतदेह विसामुंडी गावाबाहेरच्या रस्त्यावर आढळून आला.मागील २० दिवसांत नक्षल्यांनी आठ जणांची हत्या केली असून, ८ वाहनांची जाळपोळही केली आहे.नक्षल्यांनी घटनास्थळी एक पत्रक टाकले असून, त्यात आनंदराव हा एकदा पोलिस भरतीसाठी गेला होता आणि नंतर तो एसपीओ म्हणून काम करीत होता. त्याचे वडीलदेखील पोलिसांचे खबरे होते, म्हणून त्याची हत्या केल्याचे म्हटले आहे. पत्रकावर पेरमिली एरिया कमिटी असा उल्लेख आहे.
नक्षल्यांनी केली आणखी एका युवकाची हत्या
Youtube वीडियोस
1
/
153
प्रा. अनिल सोले यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळा.
लाडकी बहीण योजनेत ST,SC चे वळगलेले कोट्यवधी निधी परत करा#जन आक्रोश आंदोलन
आदिवासी स्कूल ठीक करो, CJP चा नवीन कॅम्पेन#अभिजीत दिपके
भालचंद्र जावतकर कुटुंबीयांचे 53 वर्षापासूनची जपलेली परंपरा#दरवर्षी ऋषीपंचमीच्या पावन मुहूर्तावर
रुग्णांच्या जीवाशी खेळ#मेयो मेडिकल मध्ये लाखाहून अधिक औषधे नापास#short
आदिवासी शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळणार#महसूल मंत्रीचंद्रशेखर बावनकुळे#short
1
/
153



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur