जया प्रदा यांनी ओळखला हवा का रुख: भाजप मध्ये प्रवेश

spot_img

 

नवी दिल्ली: मागे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी दलबदलू प्रवृत्तीच्या विरोधात एका मुलाखतीत ‘जब भी जी चाहे नई दूनिया बसा लेते है लोग..एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग!’ असा उपहास केला होता. आता त्यांच्याच पक्षात इतर पक्षातून सर्वाधिक उमेदवारांची ‘आयात’होत आहे,हा भाग अलहदा!
मी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्ष् ण भारतीय जनता पक्षाला देणार असल्याचे जया प्रदा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. गेल्या चार वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाने मी खूप प्रभावित झाली असल्याचे त्या म्हणाल्या. मोदी यांच्या हातात हा देश सुरक्षित राहणार आहे,मी भारतीय जनता पक्षा मुरीद झाली असल्याचे त्या म्हणाल्या. आपल्या अभिनयातून प्रेक्ष् कांना घायाळ करणा ही सौंदर्यवती आता राजकारणाचे दावपेच देखील शिफातीने शिकली. ‘हवा का रुख’ त्यांनी अगदी बरोबर ओळखला. त्यांच्या या पक्ष् परिवर्तनाने समाजवादी अखिलेश यादव गप्प आहेत. जया प्रदा यांचे राजकीय गुरु व सहोदर अमरसिंह यांनी आधीच आपल्या ट्वीटर हँडलवर नावासमोर ‘चौकीदार अमरसिंह’ लिहून योग्य ईशारा दिला होता . भाजपने जया प्रदा यांना रामपूर मधून उमेदवारी दिली असून येथे त्या त्यांच्या ‘परंपरागत विरोधक’ आझम खान यांच्याशी लढा देणार आहे. यावर ’किस पार्टी से काैन लढता है इससे मुझे फरक नही पडता’ असे विधान केले आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून समाजवादी पार्टीत असलेली प्रसिद्ध अभिनेत्री  जया प्रदा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.  जया प्रदा यांनी रामपूर लोकसभा मतदारसंघातून 2004ला विजय मिळवला होता.

या मुस्लिमबहुल भागात भाजपाला वजनदार उमेदवार सापडला असून, जया प्रदा या सपा-बसपा महागठबंधन आणि काँग्रेसलाही जोरदार टक्कर देऊ शकतात. जया प्रदा यांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत. रामपूरमधून दोनदा खासदार राहिलेल्या जया प्रदा यांचं सपाचे दिग्गज नेते आझम खान यांच्याविरोधात लढाई सुरू आहे. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत जया प्रदा या अमर सिंह यांच्याबरोबर राष्ट्रीय लोकदल(आरएलडी)मध्ये सहभागी झाले होते. त्यांना बिजनौरमधून तिकीटही देण्यात आलं होतं. परंतु मोदी लाटेत त्यांचा दारूण पराभव झाला होता. भाजपा हा जय प्रदा यांनी बदललेला चौथा पक्ष आहे. 1994मध्ये तेलुगू देसम पार्टी(टीडीपी)मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. त्याच पक्षात त्या जवळपास दशकभर होत्या.

परंतु एनटी रामाराव आजारी असल्यानं पक्षाचं नेतृत्व चंद्राबाबू नायडूंकडे गेलं आणि जया प्रदानं बंडखोरी केली. चंद्राबाबू नायडूंबरोबर त्यांचं फार काळ जमलं नाही. त्यानंतर त्या समाजवादी पक्षात सामील झाल्या आणि रामपूर लोकसभा निवडणूक लढवली. 2004च्या निवडणुकीत त्यांनी 85 हजार मतांनी विजय मिळवला. 2009लाही त्या 30 हजार मतांनी विजयी झाल्या. उत्तर प्रदेशमधल्या रामपूरमध्ये मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येनं आहे. पश्चिम उत्तर प्रदेश क्षेत्रातील रामपूरच्या जागेवर 50 टक्क्यांनी अधिक लोकसंख्या ही मुस्लिमांची आहे. रामपूर हा समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आझम खान यांचा गड समजला जातो. परंतु 2014च्या निवडणुकीच्या मोदी लाटेत भाजपाच्या नेपाल सिंह यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यावेळी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़