गरीबीवर काँग्रेस पक्षाने केला सर्जिकल स्ट्राईक- राहूल गांधी

spot_img

 

 

 

नागपूर: आजपर्यंत काँग्रेस पक्षाने जी वचने दिलीत ती पूर्ण केली. सहा महिन्यापूर्वी मला माहिती नव्हते किती पैसे आपण गरिबांच्या खात्यात जमा करु शकतो?यासाठी मी पक्षातील अर्थतज्ज्ञ व्यक्तिला खोलीत बोजावून विचारणा केली येत्या दोन-तीन महिन्यात यावर सखोल अभ्यास करुन मला एक निश्‍चित आकडा सांगा! अर्थतज्ज्ञांनी अभ्यासकरुन मला सांगितले आपण दर वर्षी गरीबांच्या खात्यात ७२ हजार रुपये जमा करु शकतो! देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का न पोहोचवता दर वर्षी गरिबांच्या खात्यात ७२ हजार रुपये म्हणजेच महिन्याला १२ हजार तर पाच वर्षात तीन लाख साठ हजार रुपये आम्ही गरिबांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली आणि हा कॉंग्रेस पक्षाने गरिबीवर केलेला सर्जिकल स्ट्राईक असल्याचे काँग्रस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष् राहूल गांधी यांनी सांगितले.
कस्तूरचंद पार्क येथे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते. याप्रसंगी मंचावर काँग्रेसचे सर्व मान्यवर नेते व पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले,की आमच्या या घोषणेवर विरोधी पक्ष् विचारतो की गरिबांच्या खात्यात जमा करायला एवढे पैसे कुठुन अाणणार? आम्ही ते अनिल अंबानी,विजय माल्या, नीरव मोदी, मेहूल चोकसी यांच्या खात्यातून आणणार. यूपीए सरकारने ४० कोटी लोकांना गरीबीतून मुक्त केले मात्र मोदी सरकारने पुन्हा करोडो लोकांना पुन्हा गरीबीत ढकलले अशी टिका त्यांनी केली. येथे उपस्थित सर्व लोकांना मी सांगू इच्छितो मला सर्वांच्या खात्यात १२ हजार रुपये जमा करायचे असे असे ते म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व भाजपच्या नेत्यांना मला सांगायचे आहे येथे नागपूरात तुम्ही जी जमीन पतांजलीला दिली तिथून हा पैसा येईल. अंबानीच्या खिश्‍यातून पैसा येईल आणि गरीबांच्या खिशात जाईल. महाराष्ट्राच्या सरकारने कर्ज माफी जाहीर केली तो पैसा मिळाला का तुम्हाला?असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. मध्य प्रदेश,राजसस्थान, छत्तीसगढमध्ये मी माझ्या मुख्यमंत्र्यांना सांगितले १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे, फक्त २ दिवसात या राज्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले.  लोकसभा निवडणुकीनंतर राफेलसारख्या घोटाळ्यांची चौकशी होईल. मोदींनी प्रक्रियाच नष्ट केली. कारवाई तर होणारच. घोटाळा कुणी केला हे पर्रिकर यांना माहीत होते. चीनमध्ये मेड इन विदर्भ दिसेल. विदर्भाला आम्ही सिंगापूर, दुबई सारखे हब बनवू इच्छित होतो. पण यांनी कामच केले नाही, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष  राहूल गांधी यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी राफेल घोटाळा, अंबानी कनेक्शन आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सडकून टीका केली.

मोदींचे वय झाले!
मी खोटे बोलत नाही कारण मला तुमच्यासोबत प्रदीर्घ नातं जोडायचं आहे.मी येथे तुमच्यासोबत २-३ दिवसांचे राजकारण करायला नाही आलो तर मला तुमच्यासोबत १५-२० वर्षांचं नातं जोडायचं असल्याचे ते म्हणाले. मला कोणतीही घाई नाही, घाई मोदींना झाली आहे कारण त्यांचं आता वय झालं आहे,त्यामुळे ते घाबरले आहेत. त्यांना सर्व गोष्टी लवकर करायच्या असल्याची कोटी राहूल यांनी यावेळी केली. मी मासोळीच्या डोळ्यात बघू शकतो. मला आपले लक्ष्य गवसले आहे त्यावर मी आता माझा बाण सोडणार आहे.

मला न्याय देण्यात आवड
उद्योगांसाठी जमीन घेऊन ५ वर्षात उद्योग उभारले नाही तर शेतकर्र्याची जमीन परत केली जाईल हा कायदा आम्ही बनवला. मला न्याय देण्यात आवड आहे. भाजप सरकारने देशातील १५ उद्योगपतींचे कर्ज माफ केले तर शेतकऱ्यांचे कर्ज का नाही माफ केले? अंबानी तर तुरुंगात जाणार होते, त्यांच्या भावाने त्यांचे कोट्यावधी रुपये भरुन त्यांना वाचवले. त्या कराराच्या वेळी गडकरी हे स्वत: उपस्थित होते. जो अंबानी एक विमान नाही बनवू शकत त्याला कोट्यावधीचे कंत्राट मिळाले. विदर्भातला विद्यार्थी, शेतकर्यांची मुले यांना का करार देण्यात नाही आला? यांना दोन हिंदूस्थान बनवायचे आहे असो आरोप राहूल गांधी यांनी केला. जीएसटीमुळे,नोटाबंदीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले त्यांचे कर्ज माफ नाही केले तर आम्ही करु, पळून जाण्यापूर्वी विजय माल्या हा देशाच्या अर्थमंत्र्यांना भेटून जातो,मेहूल चोकसी हे जेटलीच्या मुलीच्या खात्यात पैसे जमा करतात,फ्रांसच्या राष्ट्रपतींनी देखील बैठकीत मोदींनी अंबांनीविषयी बोलल्याचे कबूल केले असा आरोप आपल्या भाषणात राहूल गांधी यांनी केला. मोदी यांनी सर्वांनाच चौकीदार बनवले, संपूर्ण देश चौकिदार झाले आहे. चौकिदार हे फक्त अंबानी यांच्या बंगल्यासमोर असतात,गरीबांच्या,मजूरांच्या घरासमोर चौकिदार नसतात असे ते म्हणाले.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़