आजमखानच्या विवादित बयानाची महीला आयोगाने घेतली गंभीर दखल

spot_img

 

 

रामपूर(उ.प्र):मी नाचणाऱ्या बाईच्या तोंडी लागत नाही’ असे विवादित बयान समाजवादी पक्षाचे रामपूर(उत्तर प्रदेश) मधील उमेदवार आजमखान यांनी नुकतेच आपल्या भाषणात दिले.याची गंभीर दखल केंद्रीय महिला आयोगाने घेतली असून आजम खान यांना नोटिस जारी करण्यात आली.

मीच जया प्रदा यांना बोट धरून रामपूरच्या गल्ल्यांमध्ये फिरवले,तुम्हाला १७ वर्षे लागली ओळखायला मी १७ दिवसात तिला ओळखले अशी आजम खान यांनी भाषणात उक्ती केली. या विरोधात जया प्रदा यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत, आजम खान यांची असे शब्द वापरण्याची पूर्वी पासून सवय असल्याचे सांगितले. ते नॉर्मल माणूस नसून २००९ च्या निवडणुकीतही त्यांनी भाषेची हीच पातळी गाठली होती. मला ते कधी ‘पायातले घुंगरू’ म्हणतात कधी ‘नाचणारी बाई’ संबोधतात,माझ्यासाठी कला ही वरदान आहे,आई सरस्वतीने ती आम्हाला दिली असून ते कलेचा अपमान करतात आहेत.संविधान आणि लोकतंत्रच्या ते धज्जीया उडवतात आहे,त्यांच्या घरी देखील माता-भगिनी आहेत,त्यांच्यासाठी असे शब्द वापरले तर त्यांना कसे वाटेल? मी त्यांना भीत नाही,२००९ मध्ये मी एकटी होते यावेळी कार्यकर्ते,पक्ष,नेते,पदाधिकारी आणि स्वतः मोदीजी माझ्या सोबत आहेत. आजम खान हे रामपूरच्या जनतेचा अपमान करत आहेत त्यांच्यावर अत्याचार करीत असल्याचे जया प्रदा या म्हणाल्या.
अखिलेश यादव हे स्वतः मंचावर उपस्थित होते,ते आजम खानवर कोणतीही कारवाई करणार नाहीत असे त्या म्हणाल्या. परराष्ट्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनीही मुलायम सिंग यांना मौन तोडावे असे ट्विटर वर ट्विट केले. सध्या उत्तर प्रदेशच्या रामपूर लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण लक्ष लागले आहे. जया प्रदा आणि आजम खान या दोन पारंपरिक विरोधकांमुळे येथील लढत चुरशीची बनली आहे.
आजम खान यांनी कायद्याची पदवी घेतली आहे.९ वेळा ते आमदार राहिले,उत्तर प्रदेश सरकारमध्ये ते मंत्री देखील राहिले आहेत. जया प्रदा यांच्या विषयी त्यांनी अश्लाघ्य टिका केली. या पूर्वी देखील मॉफ चित्रफीत प्रसिद्ध करून बदनामी केल्याचे जया प्रदा यांनी सांगितले. आजम खान यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़