अर्थसंकल्पामध्ये खाद्यान्न अनुदान बिलात केवळ 6.5% वाढ शक्य

spot_img

नवी दिल्ली– आर्थिक वर्ष २०१९-२० च्या केंद्रीय अर्थसंकल्पात खाद्यान्न सबसिडीसाठी १.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात येण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये ही केवळ ६.७ टक्के जास्त असेल. २०१८-१९ च्या अर्थसंकल्पामध्ये खाद्यान्न सबसिडीमध्ये सुमारे २१ टक्के वाढ करण्यात आली होती.

अर्थ मंत्रालयाने पुढील आर्थिक वर्षासाठी आधी १.९ लाख कोटी रुपयांच्या खाद्यान्न सबसिडीचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पात सरकारला कमी तूट दाखवायची असल्याने या सबसिडीत कपात करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीनंतर सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात जास्त सबसिडी दिली जाऊ शकते. पुढील पूर्ण अर्थसंकल्प जुलै महिन्यात सादर होण्याचा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षात खाद्यान्न सबसिडीसाठी १.६९ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. नोव्हेंबरपर्यंत यातील १.४६ लाख कोटी रुपये खर्च झाले होते.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़