अखेर रामटेकचा घोळ सुटला:किशोर गजभिये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार घोषित

spot_img

नागपूर: रामटेक मतदार संघात काँग्रेसमध्ये उमेदवारीचा घोळ अखेर रविवारी सुटला. मुकुल वासनिक की नितीन राऊत की किशोर गजभिये असा खल रविवारपर्यंत कायम होता. वासनिक हे मजसचिव पदावर कार्यरत असल्यामुळे त्यांच्यावर इतर राज्यांची देखील जबाबदारी असल्यामुळे ते निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची चर्चा होती. शिवसेनेने विद्यमान आमदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली असून वंचित बहुजन आघाडीतर्फे किरण पाटणकर यांना उमेदवारी मिळाली आहे. रामटेकमध्ये आता तिरंगी लढत होणार असून रामटेकचे एकूण 2,७५,६५४ मतदार आता येत्या ११ एप्रिल रोजी उमेदवारांचे भाग्य मत पेटीत बंदिस्त करणार आहेत.रविवारी अखेर काँग्रेस पक्षातर्फे रामटेक मतदार संघासाठी किशोर गजभिये यांना उमेदवारी घोषित झाली आता तिथे शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने व किशोर गजभिये यांच्यात थेट लढत रंगणार आहे.

चंद्रपूर इथे मुख्य लढत भाजपचे हंसराज अहिर व बाळू धानोरकर यांच्यात!

लोकसभेत काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्याची हमी मिळल्यामुळेच शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता मात्र काल अनेक नाट्यमय घडामोडीतुन विनायक बांगडेची उमेदवारी घोषित झाली आणि बाळू धानोरकर यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली. रविवारी काँग्रेसतर्फे सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आली यात चंद्रपूर वरून शेवटी धानोरकर यांचे नाव घोषित झाले. तत्पूर्वी नरेश पुगलिया यांचेही नाव स्पर्धेत असल्यामुळे धानोरकर यांची चिंता वाढली होती. आचार संहिता लागू झाल्याचा दुसऱ्याच दिवशी त्यांनी अजमेज शरीफ यांच्या दर्ग्यावर चादर चढवली आणि लोकसभेच्या उमेदवारीसाठी मन्नत मागितली होती.अखेर त्यांची मन्नत रविवारी कुबल झाली!
वंचित बहुजन आघाडीतर्फे ऍड.राजेंद्र महाडोळे यांची उमेदवारी घोषित झाली असून बहुजन समाज पक्षातर्फे अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही. ‘आप’ ने ही उमेदवार निवडलेला नसला तरी शेतकरी संघटनेने विदर्भ निर्माण महामंचच्या घटक पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आधीच स्पष्ट केले आहे. मनसेने आधीच लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. चंद्रपूर इथे मुख्य लढत भाजपचे हंसराज अहिर व बाळू धानोरकर यांच्याच होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसने आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची ९वी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने एकूण १० उमेदवार जाहीर केलेत. यात महाराष्ट्रातील चार मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कथित ऑडिओ क्लीपची दखल घेतल्याने चंद्रपूरचा उमेदवार बदलल्याचं सांगण्यात येतंय. पक्षात आपलं कुणीच ऐकत नाही, असं ऑडिओ क्लीपमध्ये अशोक चव्हाण हे कार्यकर्त्याला सांगत होते. या कथित ऑडिओ क्लीपमुळे विनायक बांगडे यांची उमेदवारी रद्द करून पक्षाने चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर यांना तिकीट दिले आहे.

काँग्रेसने आज अकोला, रामटेक, चंद्रपूर आणि हिंगोली या चार लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले. अकोल्यातून हिदायत पटेल, रामटेकमधून किशोर गजभिये, चंद्रपूरमधून विनायक बांगडे यांची उमेदवारी काढून घेत पक्षाने शिवसेनेतून पक्षात प्रवेश केलेल्या सुरेश धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. तर हिंगोलीत सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़