
प्रत्येक वेळी चीनने व्हिटोचा अधिकार वापरून मसूद अझहर आणि पाकिस्तानला वाचवले होते. हा प्रस्ताव २७ फेब्रुवारीला चौथ्यांदा दाखल करण्यात आला होता. यापू यामुळे चीनच्या भूमिकेवर जगभरातून टीका करण्यात येत होती. त्यानंतर तो ‘नो-ऑब्जेक्शन’साठी १० कार्यालयीन दिवसांच्या कालावधीसाठी ठेवण्यात आला होता. ही मुदत आज (बुधवार) दुपारी ३ वाजता संपणार होती. त्यापूर्वीच चीनने पुन्हा एकदा नकाराधिकाराचा वापर केला आहे.’मसूद अझहर आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या सर्व निकषांना पात्र आहे. मंजूरी समितीसह आम्ही दहशतावाद्यांची यादी अद्ययावत आणि अचूक करण्यासाठी प्रयत्नशील आहोत,’ असे सूचक वक्तव्य अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटचे उपप्रवक्ते रॉबर्ट पॅलाडिनो यांनी केले होते. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यास हा भारताचा मोठा विजय ठरणार होता. तर, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला दणका बसला असता. मात्र, चीनने नेहमीप्रमाणे यावेळीही खोडा घातला.

या घडामोडीवर राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदींवर निशाणा साधला’ कमजोर मोदी चीनच्या राष्ट्रपतीला घाबरले, जिन पिंग सोबत झुला झुलत असतात,यावर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्र- परिषद घेऊन राहुल गांधींना खडे बोल सुनावले’ नेहरूंच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम देश आजपर्यंत भोगतोय, आतंकवादाच्या विरोधात काँग्रेस आज कुठे उभी आहे? राहुल गांधी कमी अभ्यास करतात त्यामुळेच त्यांचा परराष्ट्रीय धोरणाविषयी कमी माहिती आहे,राहुल गांधी यांचे ट्विट ‘जैश ए मोहम्मद’ यांच्या कार्यालयात वाचले जातात, गांधी यांचे ट्विट पाकिस्तानच्या प्रसार माध्यमांचे प्रमुख मथळे बनतात, असे आरोप रविशंकर प्रसाद यांनी पत्र-परिषदेत केलेत.
\



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur