इनोव्हेशन व्यावसायिकरित्या परवडणारे असावे-नितीन गडकरी

नागपूर: सातत्याने जग बदलत असून दिवसेंदिवस नवनवे संशोधन पुढे येत आहे. इनोव्हेशनमध्ये कल्पना शक्तीला वाव आहे. इनोव्हेशनमध्ये शंभर टक्के तंत्रज्ञान, कमी भांडवल आणि गुणवत्ता महत्वाची आहे. असे असले तरी संशोशन हे व्यवसायिकरित्या परवडणारे असावे तसेच प्रयोगामध्ये यशस्वी असले पाहीजे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
कविवर्य सुरेश भट सभागृह येथे रविवारी (ता.३ मार्च) रोजी, महापौर इनोव्हेशन अवार्ड इनोव्हेटर्सना देण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी, खा.विकास महात्मे, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर आ. मिलिंद माने, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, सत्तापक्षनेते संदीप जोशी, बसपाचे गटनेता मो.जमाल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे गडकरी म्हणाले, आजच्या युवकांमध्ये मोठी कल्पना शक्ती आहे. यातून नवनवे संशोधन पुढे येऊ शकते. केवळ, त्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. इनोव्हेशन हे कमर्शिअली परवडणारे नसतील तर त्याचा काहीही अर्थ नाही. प्रयोग कर्मशिअली यशस्वी होने महत्वाचे आहे. शहराला प्रयोगाचा लाभ झाला पाहीजे. नागपूर शहरात अनेक प्रकल्प हे इनोव्हेशनच्या माध्यमातूनच राबविण्यात आले असून कर्मशिअली ते यशस्वी असल्यामुळे जनतेला त्याचा लाभ होतोय. व् नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातील वाहने ज्या दिवशी बायो सिएनजीवर चालतील त्या दिवशी एक थेंब पेट्रोल विकावे लागणार नाही असे आपले स्वप्न आहे. याकरिता चार प्लांट तयार करण्यात येणार आहे. महापौर इनोव्हेशनच्या माध्यमातून ज्या कल्पना पुढे आल्या त्या कर्मशिअली यशस्वी होईस्तोवर महापालिकेने भक्कमपणे त्यांच्या पाठीशी राहावे. नवे प्रयोग राबविल्यानेच शहर सुखी आणि संपन्न होईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, महापौर इनोव्हेशन अवार्डमध्ये एकूण ७५० नाविन्यपूर्ण कल्पना सादर झाल्यात. यापैकी, १०० कल्पना निवडूण तीन कॅटेगिरीमध्ये त्यांचे विभाजन करण्यात आले. यातील निवडक कल्पना या पुरस्कारासाठी पात्र ठरल्या असून त्या इनोव्हेटरला कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur