लोकप्रतिनिधींचा टँकर!! महापालिकेत खडाजंगी

spot_img

नागपूर: महापालिकाने शहराला पाणी पुरवठ्याची जवाबदारी ज्या ओसीडब्ल्यूवर सोपवली ती कंपनी ७० टक्के भागात दूषित पाण्याचा पूरवठा करते अश्यात या कंपनीला आणखी ५० कोटी रुपये देण्यात येत असलेतरी कंपनीच्या निकृष्ट कामाबाबतही सभागृहाने लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे नेटवर्क आणि नॉन नेटवर्क भागात टँकरनी जो पाणी पुरवठा केला जातो त्या टँकर धारकांचं नाव,पत्ता आणि वाहन क्रमांक याची माहिती प्रशासनाला विचारले असता, त्यांनी अशी माहिती व्यवसायिकरित्या गुप्त ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले यावरून ‘लोकप्रतिनिधींचेच’ टँकर चालतात काय, अशी शंका येते,असे वादग्रस्त वक्तव्य आभा पांडे यांनी मंगळवारी महापालिकेच्या विशेष सभेत करताच,सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी सुरू झाली.
यावर माजी महापौर प्रवीण दटके यांनी माननीय नगरसेविका यांना ज्यांची टँकर चालतात अश्या लोकप्रतिनिधिंची नावे माहिती असल्यास त्वरित सभागृहात जाहीर करावी अन्यथा आपले शब्द मागे घ्यावेत अशी मागणी केली. सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी देखील आभा पांडे यांनी जो आरोप केला आहे त्याची माहिती द्यावी नाही तर माफी मागावी अशी मागणी केली. सभासगृहात सत्ता पक्षाचे १५६ नगरसेवक आहेत त्या सर्व नगरसेवकांचे नेटवर्क भागात टँकर चालतात का? असा प्रश्न उपस्थित केला. या सभागृहात एकाही नगरसेवकांचे टँकर चालत नाही,लोकप्रतिनिधी कायद्यात ते बसत नाही,त्वरित त्यांचे निलंबन होऊ शकते म्हणून त्यांची नावे देण्याची मागणी रॉय आणि वीरेंद्र कुकरेजा यांनीही केली. २०० कोटींचे कर्ज तसेच ओसीडब्ल्यूला ५० कोटी देण्याचा निर्णय तीन महिन्यापूर्वीच घेण्यात आला,यावर आक्षेप होता तर काँग्रेसच्या प्रतिनिधींनी स्थायी समितीच्या बैठकीत का नोंदवला नाही,टेंडर शिवाय टँकर चालवता येत नाही,आभा पांडे या चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करतात आहेत,असा आरोप धर्मपाल मेश्राम यांनी केला.
मनोज सांगोळे यांनी यावर बैठकीत बोलूच दिले गेले नसल्याचे सांगितले. ‘शहरात नगरसेवकांचे टँकर’ या लोकप्रतिनिधींवरील आरोप यावरच विरोधक व सत्ता पक्षात बराच वेळ खडाजंगी सुरू राहिली

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़