वेगवेगळ्या घटनेत चौघांची गळफास घेऊन आत्महत्या

spot_img

वेगवेगळ्या घटनेत चौघांची गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर : कळमना, एमआयडीसी, तहसील, सक्करदारा पोलीसठाण्याच्या हद्दीत
घडलेल्या चार वेगवेगळ्या घटनेत
चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत कळमना हद्यीतील भगत नगर,
नागपूर येथे राहणारे कमल चौनदास
लहरे (५०) यांनी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजताच्या दरम्यान राहत्या घरी छताच्या लाकडी बल्लीला
नायलॉन दोरीच्या साहायाने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी
फिर्यादी उषा कन्हैया लहरे (२५) यांनी दिलेल्या सुचनेवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दुसऱ्या घटनेत एमआयडीसी हद्यीतील केशव माधव नगर, जयताळा, नागपूर येथे
राहणारे राहुल भीमराव कुकडे (३५,मुळ पत्ता अहेरी, गडचिरोली) यांनी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.२४
वाजताच्या सुमारास घराच्या वरच्या माळ्यावर
छताच्या लोखंडी पाईपला प्लॅस्टीकच्या पाईपच्या साहायाने गळफास लावून
आत्महत्या केली. याप्रकरणी फिर्यादी रोहीत चंद्रशेखर बनकर (२६) यांनी दिलेल्या सुचनेवरून एमआयडीसी पोलिसांनी
अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
तिसऱ्या घटनेत तहसील हद्यीतील टिमकी खाटीकपुरा, नागपूर येथे राहणारे अनंतकुमार पंचकवडीलाल पुरे (६६) यांनी
२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३५ वाजताच्या सुमारास राहत्या घरी पंख्याच्या हुकला दोरीने गळफास लावून आत्महत्या
केली. याप्रकरणी फिर्यादी रॉबिन अनंत पुरे (३४) यांनी दिलेल्या सुचनेवरून तहसील पोलिसांनी यांनी अकस्मात मृत्यूची
नोंद केली आहे.चवथ्या घटनेत सक्करदरा हद्यीत आशीर्वादनगर, नागपूर येथे राहणाºया नसरीम
शेख अकबर (३२) यांनी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजताच्या दरम्यान राहत्या घरी सिलिंग
फॅनला ओढणीच्या सहायाने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी फिर्यादी शेख अकबर मो. हनीफ (४७) यांनी
दिलेल्या सुचनेवरून सक्करदरा पोलिसांंनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़