‘संमेलनाची वारी १ ते ९९’ नी फेडले डोळ्यांचे पारणे

spot_img

‘संमेलनाची वारी १ ते ९९’ नी फेडले डोळ्यांचे पारणे

नागपूर : ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी,नागपूर शाखेतर्फे सादर झालेल्या ‘संमेलनाची वारी १ ते ९९’ यांनी प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. पहिल्या नाट्य संमेलना पासून ते ९९ वे नाट्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविणाऱ्या वेगवेगळ्या अध्यक्षांनी नाट्य चळवळीला दिलेले योगदान, त्यांची विचारसरणी,कर्तृत्व,कामगिरी इ.चा नेत्रदीपक तसेच अभ्यासपूर्ण धावता आढावा या सादरीकरणात घेण्यात आला आणि नागपूरकर प्रेक्षक या अनोख्या सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार बनले.

२८ आगस्ट १९०५ रोजी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली .दादासाहेब खापर्डे यांना पाहिले संमेलनाध्यक्ष होण्याचा मान प्राप्त झाला. दुसरे संमेलनाध्यक्ष नृसिंह चिंतामणी केळकर ते आताच्या ९९ वे संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गजवी यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव म्हणजे ‘१ ते ९९ ‘ ही संमेलनाची वारी होय. संमेलनाच्या या रंग प्रवासाने ‘अमृत भरावे’ अश्या रीतीने प्रेक्षकांना अडीच तास खिळवून ठेवले.कीर्तनकारां पासून सुरू झालेला नाट्य प्रवास, लेखक व ९९ वे नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गजवी यांच्यापर्यंत अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने उलगडण्यात आला. यासाठी लेखक नितीन नायगावकर व देवेंद्र बेलणकर हे निश्चितच कौतुकास पात्र आहेत. शालेय चिमुरड्यांपासून ते सळसल्या तरुणाईला घेवून नागपूरच्या २०० कलावंतांनी यात सहभाग नोंदवला. देशप्रेमानी भारावलेला स्वातंत्र्यपूर्व काळ ते हौशी, प्रायोगिक,व्यावसायिक असे नाट्य प्रवासातील विविध टप्पे या सादरीकरणात उलगडण्यात आले. अनेक दशके स्त्रियांची भूमिका पुरुष कलाकारच पार पाडत होते,तेव्हा नाटकात काम करणे तर दूर,नाटक बघणेही स्त्रियांसाठी वर्ज्य होते,अश्या काळात ६३ वे नाटय संमेलन याला अपवाद ठरले. प्रथमच ‘अंधळ्यांची शाळा’ नाटकात ज्योतसनाबाई घुळे यांचं ‘आलं कुशीत समंदर’ हे कोहळी गीत गाजले आणि चित्रपटांमुळे नाटकंपासून दूर झालेला प्रेक्षक पुन्हा नाटकांकडे वळला.

नागपुरातील दानशूर लोकांच्या मदतीने नागपुरात १९३९ साली पाहिले नाट्य संमेलन भरले, अध्यक्ष होते त्र्यंबक सीताराम कारखानीस. याच संमेलनात ‘ महाराष्ट्र नाट्य संमेलन’असे संमेलनाचे नाव ठरले आणि नागपूरसाठी ही एक भूषणावह बाब ठरली. यानंतर १९४४ व १९८५ साली नागपुला नाट्य संमेलनाचे यजमानपद भूषविण्याचा मान मिळाला. नागपुरात पार पडणारे हे ४ थे संमेलन आहे.लोकमान्य टिळक,क्रांतीसूर्य विनायक दामोदर सावरकर ते आचार्य अत्रे, मामा वरेरकर ते जयंत सावरकर,पु.ल.देशपांडे ते लालन सारंग अश्या एकूण ९९ संमेलनाध्यक्ष यांच्या वैशिष्टपूर्ण कार्यकर्तृत्वाचा धावता आढावा घेणे सोपे नसताना, नागपूर शाखेने अतिशय चोखपणे हे आव्हान पार पाडले. यासाठी एलईडीचा केलेला वापर व द्रुक-श्राव्य परिणाम अतिशय प्रभावी ठरला. अनेक गाजलेल्या नाटकांचे सीन, नागपूरच्या कलावंतांनी दमदारपणे सादर करून प्रेक्षकांची उस्फुर्त दाद मिळवली. मराठमोळ्या मराठी प्रेक्षकपासून ते अमेरिकेच्या न्यू जर्सी पर्यंत झेप घेणाऱ्या एकूण ९९ नाट्यसंमेलनाची ही वारी म्हणजे ‘केवल्याच्या चांदण्याला दिसला चकोर’ अशीच होती. संकल्पना व दिग्दर्शन देवेंद्र बेलणकर,सह दिग्दर्शन सोमेश्वर बालपांडे व सुबोध सुरजीकर, कार्यकारी निर्मिती रुपाली मोरे- कोंडावार यांची असून रंग आवृत्ती नरेश गडेकर यांची होती. थोडक्यात रंगभूमी अशी जादू आहे ज्याची पाठ खरा कलावंत काहीही सोडत नाही. महाराष्ट्राच्या नाट्य चळवळीला समृद्ध करणाऱ्या अश्या अनेक कलावंतांना नागपूर शाखेने दिलेला हा अनोखा सलामच होता,अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांमध्ये उमटली हे विशेष.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़