मनपा कार्यालये पाणी पुरवठा केंद्रात आता ‘सौर ऊर्जा’

spot_img

नागपूर: महापालिका मुख्यालय तसेच मनपचा सर्व दहा झोनल कार्यालयांसह पाणी पुरवठा केंद्र व मनपा शाळांच्या इमारतींवर आता सौर ऊर्जा संयंत्र लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी गुरुवारी माध्यम संवादातात दिली. मुख्य म्हणजे या प्रकल्पाचा खर्च होणाऱ्या वीज बचतीतून केला जाणार आहे. यातून पुढे 535 कोटींची बचत होणार आहे.

वर उल्लेखित मनपा कार्यालये व पाणी पुरवठा केंद्राच्या वीज बिलावर दरवर्षी महापालिकेला १०० कोटींचा खर्च येतो. सौर ऊर्जा प्रकल्पावर येत्या २० वर्षात ९४५ कोटी ३४ लाख ७७ हजार ६०० रुपये खर्च होणार असून ही रक्कम २० वर्षात परतफेड करायची आहे. यातून ४२ मेगावॉट्स वीज निर्मिती केली जाणार आहे. ३ कंपन्यांना हे काम देण्यात आले असून यात में.शांती जी.डी. इस्पात अँड पॉवर प्रा.लि. रायपूर,में.रोहित स्टील नागपूर तसेच में.ब्राईल सोलर एनर्जी प्रा.लि. चेन्नई यांचा समावेश आहे. महापालिकेच्या ज्या इमारतीत मीटरनिहाय १ किलोवॅट किंवा त्याहून अधिक वीज वापर आहे अश्या इमारती व कार्यालयात सौर ऊर्जा संयंत्र बसविण्यात येईल. मनपाच्या इमारतींवर १ ते ७९० कि. वॅट क्षमतेचे तर पथदिव्यांच्या रस्त्यांवर ६ ते १५ कि. वॅट क्षमतेचे इलेव्हेटेड स्ट्रक्चर उभारण्यात येईल. यासाठी प्रति कि. वॅट दर महिन्याला १२९० रुपये प्रमाणे २० वर्षात परतफेड करावयाची आहे तर पाणी पुरवठा केंद्र व मल निस्सारण केंद्रासाठी अधिक क्षमतेचे ग्राउंड मोउंटेड स्ट्रक्चर उभारण्यात येतील. याची क्षमता २ हजार ते ४ हजार कि. वॅट राहणार असून हा प्रकल्प महापालिकेला २० वर्षांनंतर हस्तांतरित केला जाईल.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़