कारच्या धडकेत पादचारी विवाहितेचा मृत्यू 

spot_img
 नागपूर. डोंगरगावातील राष्ट्रीय महामार्ग -7 वरुन रस्ता ओलांडत असतांना एका भरधाव कारच्या धडकेत एका 50 वर्षीय विवाहितेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी चारच्या दरम्यान घडली. मंदा लेकराज माहाकाळकर (50) असे मृत विवाहितेचे नाव आहे. 
सुत्रांनुसार, हनुमानखेडा, समुद्रपूर, वर्धा येथे राहणाऱ्या मंदा या पती लेकराज महाकाळकरसोबत मंगळवारी डोंगरगावात आल्या होत्या. दुपारी चारच्या दरम्यान पतीसह मंदा या राष्ट्रीय महामार्ग -7 वरुन रस्ता ओलांडत असतांना नागपूरहून बुटीबोरी मार्गावरून येत असलेल्या एमएच-31/ईए-2889 क्रमांकाच्या कार चालकाने त्यांना धडक दिली. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात नेत असतांना त्यांना उपचार मिळण्यापूर्वीच मृत पावल्या. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी तृर्तास अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 
—————-

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़