बजेरियात डॉक्टरच्याघरी धाडसी घरफोडी

spot_img
2 ठिकाणी चोरट्यांनी 9.55 लाखांचा ऐवज लांबविला 
नागपूर. शहरातील वाडी व गणेशपेठ ठाण्याअंतर्गत घडलेल्या दोन वेगवेळ्या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप व कोंडा तोडून जवळपास साडे नऊ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. 
पहिल्या घटनेत बजेरीया येथील नागेश्वर मंदीर मागे राहणाऱ्या डॉ. नताशा ज्ञानेश्वर शुक्ला या घराला कुलूप लावून रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान परिवारासह लग्नाकरिता इलाहबादला गेल्या होत्या. दरम्यान घरी कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील मुख्य दाराचे कुलूप व कोंडा तोडून घरात प्रवेश केले. यानंतर चोरट्याने डॉ. शुक्ला यांच्या बेडरुममधील कपाटाचे लॉक तोडून तेथील 2 लाखांची रोकडसह सोने चांदिचे दागिने असा एकूण 3 लाख 60 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. डॉ. शुक्ला या सोमवारी सकाळी साडेअकराला घरी परतल्यावर त्यांना चोरी झाल्याचे समजले.  
दुसऱ्या घटनेत कंट्रोल वाडी परिसरातील रामजी आंबेडकर चौक येथे राहणारे सचिन युवराज मेश्राम (38) हे शनिवारी सकाळी साडेबाराच्या दरम्यान परिवारासह गडचिरोलीला गेले होते. याचवेळी घरी कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी मेश्राम यांच्या घराचे कुलूप व कोंडा तोडून घरात प्रवेश केले. चोरट्यांनी यानंतर लोखंडी कपाटातून सोने चांदिचे दागिने व रोख 5 लाख 80 हजारांची रोकड असा एकूण 5 लाख 95 हजारांचा ऐवज लांबविला. मेश्राम हे रविवारी सकाळी घरी पोहचल्यावर त्यांना चोरीचे समजले. या दोन्ही घटनेत गणेशपेठ व वाडी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करीत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. 

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़