एअर शो सरावादरम्यान दोन विमाने एकमेकांना धडकली; पायलट बचावले

बंगळुरू – हवाई दलाच्या एअर शो सरावादरम्यान, दोन सुर्यकिरण विमांनाची धडक झाल्याची भीषण घटना बंगळूरुच्या येलहंकामध्ये घडली. या अपघातात पायलट्सने प्रसंगावधान राखत वेळीच ‘एक्झीट’ घेतल्याने दोन्ही विमानांचे पायलट बचावले आहेत.
बंगळूरूमधील येलहंकामध्ये हवाई दलाच्या एअर शोचा सराव सुरू होता. सुर्यकिरण विमाने हवेत झेप घेत वेगवेगळी प्रात्यक्षिके करित होती. यावेळी अचानक दोन विमानांची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात दोन्ही विमानातील पायलटनी प्रसंगावधान दाखवत विमानातून उडी घेतली. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur