आरटीओतील दलाल ‘एसीबी’च्या जाळ्यात

spot_img

आरटीओतील दलाल ‘एसीबी’च्या जाळ्यात
– कारच्या कागदपत्रासाठी मागितले पैसे
नागपूर. कारची कागदपत्रे हरविल्याने दुय्यम पत्र काढून देण्यासाठी आरटीओ कार्यालयातील दलालास 5 हजार 700 रूपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी दुपारला रंगेहात अटक केली. सावजी वानखेडे (50, रा. छावणी) असे लाचखोर दलालाचे नाव आहे.
तक्रारदार व्यक्‍ती हे शासकीय नोकरीत असून ते भानखेडा-टिमकी परिसरात राहतात. त्यांच्या एमएच-49/यु-5219 क्रमांकाच्या ऑल्टो कारची कागदपत्रे गहाळ झाली. त्यामुळे त्यांना कागदपत्रांची दुय्यम प्रत काढायची होती. गेल्या आठवड्यात ते राज्य परिवहन विभाग कार्यालयात (आरटीओ) गेले. तेथे दलाल गोपाल वानखेडे याने त्यांना हेरून आरटीओमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेटींग असल्याचे सांगून लगेच दुय्यम प्रत काढून देण्याचे आश्‍वासन दिले. त्यासाठी सहा हजार रूपयांची लाच मागितली. 80 टक्‍के रक्‍कम आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तर 20 टक्‍के रक्‍कम स्वतः दलाली म्हणून घेण्याचे वानखेडे बोलला. तक्रारदाराला मात्र लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. एसीबीने तक्रारीची शहानिशा केली. शनिवारी आरटीओ कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराने पैसे देण्याची तयारी दर्शविली. त्याला 300 रूपये सूट दिली. 5 हजार 700 रूपये स्विकारताच लपून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा घातला. आरोपी दलाल गोपाल वानखेडेला अटक केली तसेच त्याच्याकडून पैसेही जप्त केले. आरोपीविरूद्ध सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़