पाण्याचे कनेक्शन लावणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापौरांनी फटकारले

spot_img


नागपूर,ता. १२ : शुद्ध पाणी, स्वच्छता, वीज, रस्ते या नागरिकांच्या मुलभूत सुविधा आहेत. प्रत्येकाला नियमित या सुविधा प्रदान करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कर्तव्य बजावून नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देऊन त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मंगळवारी (ता. १२) महापौर नंदा जिचकार यांनी नेहरूनगरमधील प्रभाग २६ व २७ चा दौरा करून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मिरे लेआउट, भांडे प्लॉट, जगनाडे चौक, नंदनवन हसनबाग, वाठोडा आदी ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला.
नेहरूनगर येथील मिरे ले-आउट येथील एका भूखंडधारकाने सुरक्षा भिंत निर्माण केल्यामुळे मिरे ले-आऊट व कबीर नगर वस्तीतून जाणारा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आपात्‌कालीन प्रसंगी अनेक त्रास सहन करावे लागतात. याशिवाय वस्तीतील मार्गावरील अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी यावेळी केली. रिकाम्या भूखंडाची योग्य माहिती काढून त्यासंबंधी योग्य कार्यवाही करणे तसेच अतिक्रमणाबाबतही आवश्यक कागदपत्रांची पाहणी करून योग्य कार्यवाही करण्याचे महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.
भांडेप्लॉट येथील पाईप लाईन लिकेज असल्याने नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शिवाय सायंकाळी ५ वाजता पाणी पुरवठा होत असल्याने महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार परिसरातील महिलांच्या वतीने यावेळी करण्यात आली. दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे परिसरातील पाईप लाईन बदलविणे व पाणी पुरवठ्याची वेळ ६ वाजता करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
जगनाडे चौकातील सेव्हनस्टार हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या वाहनांची पार्किंग रस्त्यावर होत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होते यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही त्वरित करण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले. नंदनवन येथील हसनबाग पोलिस चौकीजवळील परिसरात गडर लाईनच्या कामाचा प्रस्ताव तयार असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचेही निर्देश महापौरांनी दिले. याशिवाय परिसरात पोलिस चौकीच्या मागील बाजूस कचऱ्याचे साम्राज्य असून बाजूलाच नागरिकांकडून घाण पसरविली जात आहे. लगतच्या गडर लाईनच्या वरील स्लॅब तुटल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार रहिवाशांनी यावेळी केली. परिसरातील कचऱ्याची त्वरित सफाई करून गडर लाईनवरील स्लॅबचीही दुरूस्ती करण्याचे महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.
गडर लाईनच्या चेंबरमधून पाण्याचे कनेक्शन लावणाऱ्या कर्मचाऱ्याला यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी चांगलेच फटकारले व संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईचेही निर्देश त्यांनी दिले. नंदनवन येथील हसनबाग पोलिस चौकीपुढील मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असल्याने येथे सतत अपघाताचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी या चौकामध्ये वाहतूक सिग्नल लावण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़