माझ्या भागात जातीयवाद केल्यास चोप दिला जाईल! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा इशारा

spot_img

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी पुण्यातील एका कार्यक्रमात जातीयवाद करणाऱ्यांना गर्भित इशारा दिला आहे. माझ्या भागात कुणी जातीयवाद केल्यास चोप दिला जाईल अशा शब्दांत केंद्रीय मंत्र्यांनी ठणकावले आहे. एवढेच नव्हे, तर हीच गोष्ट आपण आपल्या कार्यकर्त्यांना देखील सांगितल्याचे गडकरींनी स्पष्ट केले आहे. पिंपरी चिंचवड परिसरात पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. समाजाला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या एकत्रित आणायला हवे. यात जातीयवाद आणि धर्मवादाला जागा असूच नये असे मत केंद्रीय मंत्र्यांनी मांडले आहे.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़