नागपूर 02: श्री. किरण सेनाड विरुद्ध न्यू विराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स व नागपूर सुधार प्रन्यास या न्यायालयीन प्रकरणात (M C A No. 73/2010) मा. न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाच्या अनुशंगाने आज शनिवार, दिनांक 02/02/219 रोजी प्लॉट न. 44, साकेत नगर, सिरसपेठ को. ऑप. हाऊसिंग सोसायटी, मौजा बाबुळखेडा, खसरा क्रमांक 58/1 येथील अनाधिकृत बांधकाम नागपूर सुधार प्रन्यासच्या विभागीय कार्यालय (दक्षिण) मार्फत काढण्यात आले.
सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 1 जेसीबी आणि 1 टिप्पर च्या सह्याने सदर कारवाई करण्यात आली. मा. अधिक्षक अभियंता (मुख्यालय), नागपूर सुधार प्रन्यास यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत नागपूर सुधार प्रन्यासचे विभागातील कार्यकारी अभियंता (दक्षिण), श्री. संजय एन. चिमुरकर, विभागीय अधिकारी (दक्षिण) श्री. अविनाश प्र. बडगे, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ श्री. संदीप एम. राऊत, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक, श्री. रवि रामटेके आणि क्षतीपथक प्रमुख श्री मनोहर पाटील यावेळी उपस्थित होते.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur