बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड मध्ये आरोपी क्रमांक 3 अंकित शाहु याचा जामिन अर्ज माननीय जिल्हा सत्र न्यायालय यांनी रद्द केला ।

spot_img

बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड मध्ये आरोपी क्रमांक 3 अंकित शाहु याचा जामिन अर्ज माननीय जिल्हा सत्र न्यायालय यांनी रद्द केला ।

नागपुर मधील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड मधील आरोपी क्रमांक 3 अंकित शाहु ने जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री ए.एस.काझी साहेब (DJ- 8 ) यांच्या न्यायालयात जामीनावर सोडण्याकरिता अर्ज प्रथम लावलेला होता ,

सरकार तर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी युक्तिवाद केला की आरोपी हा दूहेरी हत्याकांडात सहभागी होता, व त्याचा इतर आरोपी सारखाच सहभाग आहे, त्याचे विरुद्ध भरपूर पुरावा उपलब्ध आहे, व त्याला जामिनावर सोडल्यास हा साक्षदारांना धमकाऊ शकतो , त्यामुळे ह्याला जामीन देने योग्य होणार नाही, 17 फेब्रूवारी 2017 रोजी उषा कांबळे वय 54 वर्ष व त्यांची चिमुकली नात राशी कांबळे दिढ़ वर्ष यांचा गळा कापुन त्यांचे शव पोत्यात भरून 3 किलोमीटर दुरच्या विहिरगाव च्या नाल्यात फेकले व त्यांच्या आंगावरचे सोन्याचे दागीने गहाळ केले व शांत डोक्याने हत्या करुण पुरावे नष्ट केले ,जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला, वरील सगळ्या बाबी आदेशात नमुद करुण न्यायाधीश ए. एस.काझी साहेब यांनी आज दिनांक2 /2 /2019 रोजी आरोपी अंकित शाहु चा जामीन अर्ज रद्द केला.यापुर्वी सुद्धा आरोपी क्रमांक 2 गुड़िया गणेश शाहु हिचा जामिन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश (DJ- 8) श्री ए.एस. काझी यांनी चार दा रद्द केला आहे .

सरकार तर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी युक्तिवाद केला फिर्यादि तर्फे अधिवक्ता समीर सोनवणे व आरोपी च्या वतीने देवेंद्र चव्हाण यांनी बाजु मांडली .

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़