चार मेट्रो स्थानकावर मिळणार ‘लिज’वर जागा

spot_img

शेकडो व्यापारी करत आहेत महा मेट्रोशी संपर्क

नागपूर २९ : शहरात निर्माणाधीन महा मेट्रो नागपूर प्रकल्पाचे कार्य वेगाने पूर्णत्वास येत आहे. यामुळे ‘रिअल इस्टेट मार्केट’ सुद्धा आज उल्लेखनीय कामगिरी करत आहे. महा मेट्रो नागपूरने देखील व्यवसायिक दृष्टीकोनातून महा मेट्रोची जागा लिज’वर देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम टप्प्यात खापरी, एअरपोर्ट साऊथ, न्यू-एअरपोर्ट आणि जयप्रकाश नगर या चार मेट्रो स्टेशनवर महा मेट्रो नागपूर व्यवसायिकांसाठी लिज’वर जागा उपलब्ध करून देत आहेत. महा मेट्रोने वृत्तपत्र आणि वेबसाईट’च्या माध्यमातून प्रसारित केलेल्या जाहिरातीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या जागेसाठी तब्बल ४०० हुन अधिक नागरिकांनी महा मेट्रोच्या संकेत स्तळावर भेट दिली आहे. व्यायसायिकांसाठी उपलब्ध होणाऱ्या जागेचे शुल्क निर्धारित करण्यात आलेले असून यासंबंधित सविस्तर माहिती महा मेट्रोच्या वेबसाईटवर उपल्बध करून देण्यात आलेली आहे.

दोन वेग-वेगळ्या विभागात निविदा पूर्व प्रक्रिया विभाजित करण्यात आली आहे. यात १००० चौरस फूट पेक्षा कमी क्षेत्रफळ इतक्या जागेसाठी ९ वर्षाचा कालावधी निर्धारित करण्यात आला असून यात ६ महिन्याची अग्रीम राशी (ऍडव्हान्स पेमेंट) जमा करणे बंधनकारक आहे. तर १००० चौरस फूट पेक्षा कमी क्षेत्रफळा इतक्या जागेसाठी ३० वर्षाचा दीर्घ कालावधी निर्धारित करण्यात आलेला आहे. महा मेट्रोच्या अटी व शर्तीनुसार संपूर्ण निविदा पूर्व प्रक्रिया सुरु आहे. जागेसाठी ७४१०००४३२१ या व्हाट्सॲप क्रमांकावर, महा मेट्रोच्या अधिकृत ई-मेलवर, आणि दूरध्वनी’च्या माध्यमातून महा मेट्रोशी संपर्क साधत आहेत. लिज’वर जागा दिल्याने महा मेट्रोला उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत उपल्बध होणार आहे. यामुळे मेट्रोचे प्रवासी दर ही कमी असतील जेणेकरून जास्तीत जास्त नागरिक मेट्रोने प्रवास करतील.

लवकरच रिच-१ कॉरिडोर मध्ये सीताबर्डी मेट्रो जंक्शन ते खापरी मेट्रो स्टेशन पर्यंत आणि रिच-३ कॉरिडोर मध्ये मेट्रोची प्रवासी सेवा सुरु होणार आहे. यासाठी वर्धा मार्गावर खापरी, एअरपोर्ट साऊथ, न्यू-एअरपोर्ट आणि जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन आणि हिंगणा मार्गावर सुभाष नगर व लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन नागरिकांसाठी सुरु होणार आहे. तेव्हा वर्धा मार्गावरील चार मेट्रो स्टेशनवर येणाऱ्या प्रवाश्यांची संख्या लक्षात घेता याठिकाणी व्यावसायिक उत्पन्नासाठी लिज’वर जागा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़