‘ठाकरे’ चित्रपटावरून पानसे-राऊत वाद

spot_img

मुंबई – ‘ठाकरे’ या चित्रपटाचा “प्रीमियर’ बुधवारी सायंकाळी वरळी येथे झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मनसेचे नेते अभिजित पानसे येण्यापूर्वीच खेळ सुरू झाला. बसण्यासाठी व्यवस्था न केल्यामुळे नाराज झालेले पानसे चित्रपट न पाहताच निघून गेले. त्यावरून या चित्रपटाचे निर्माते शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि पानसे यांच्यात वाद झाला. राऊत यांनी केलेल्या ट्‌विटमुळे वाद चिघळला; नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवल्यावर राऊत यांनी हे ट्‌विट काढून टाकले.

‘ठाकरे’ चित्रपटाच्या “प्रीमियर’वेळी झालेल्या मानापमान नाट्यानंतर राऊत यांनी ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला, की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे,”

असे खोचक ट्‌विट करीत पानसे यांना टोला लगावला होता. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पानसे यांना पाठिंबा देत, ‘मा. बाळासाहेब सामान्य शिवसैनिकालासुद्धा प्रेमाने वागवायचे; त्याचा अपमान नाही करायचे. हाच ठाकरे चित्रपटाचा संदेश आहे. तो या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्यांनाही कळला नाही,” असे ट्‌विट केले. त्यानंतर मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक नेटकऱ्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे राऊत यांनी माघार घेत वादग्रस्त ट्‌विट काढून टाकले.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़