शहीदाच्या पत्नीची मुलाच्या पदोन्नती करीता शासन दरबारी भटकंती

spot_img

नागपूर : झरी नाला िंसगनडोह,ता.देवरी गोंदीया येथे दि.२०/०१/२००३ ला नक्षल्यांकडून झालेल्या बॉम्ब ब्लािंस्टग हल्ल््यात शहीद झालेल्या पोलिस उप निरिक्षकाच्या मुलाच्या पदोन्नतीकरीता आईची वण-वण भटंकती सुरू आहे. परंतु पदरी निराशा मिळत असल्यामुळे येत्या २३ जानेवारी रोजी संविधान चौकात आमरण उपोषण करणार असल्याची माहिती शहीदाची पत्नी पुष्पा रहिले यांनी पत्रपरिषदेत दिली.

यावेळी पुष्पा रहिले यांनी सांगितले की, पती दिपक रहिले हे झरी नाला िंसगनडोह, देवरी गोंदीया येथे पोलिस उप निरिक्षक या पदावर कार्यरत होते. २० जानेवारी २००३ मध्ये नक्षल्यांकडून झालेल्या बॉम्ब हल्ल््यात ते शहीद झाल्यामुळे माझ्या मुलाला शासनाच्या ६ फेब्रुवारी २००९ च्या परिपत्रकानुसार अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी म्हणून गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना वारंवार निवेदन प्रतिनिवेदन देण्यात आले.
शासनाने यांची दखल घेत २७ फेब्रुवारी २००९ रोजी माझा मुलगा सागर दिपक रहिले याला पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती देण्यात आली. जेव्हा की शासन निर्णयानुसार त्याला त्याच्या गुणवत्ता व शैक्षणिक पात्रतेनुसार द्यायला हवे होते. परंतु शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता आजही त्याला शिपाई पदावरच कार्यरतच रहावे लागत आहे. शासनाच्या ६ फेब्रुवारी २००९ च्या निर्णयानुसार लाभ देण्यात यावा. देशासाठी जिवाची बाजी लावून सगळयांनी सारखच बलिदान दिले आहे. तर शासन निर्णय सुद्धा सगळ्यांना सारखाच लागू झाला पाहिजेत.
कारण शासन निर्णयाप्रमाणे बाकी शहिद झालेल्या कुटुंबियांना शैक्षणिक अर्हर्तेनुसार वर्ग अ, ब मध्ये नोकरी मिळाली असून आम्हाला मात्र सावत्रपणाची वागणूक दिल्या जात आहे. आम्हालाही इतर शहिदांच्या कुटुंबियांप्रमाणे न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी शासन दरबारी वण वण भटकुनही पदरी निराशाच पडत असल्यामुळे येत्या २३ जानेवारी रोजी संविधान चौकात आमरण उपोषण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी टिळक भवनातील पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़