नागपूर : नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी दिनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेअंतर्गतच्या प्रस्तावांना बँकांनी सुलभपणे कर्ज पुरवठा करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बँकेच्या प्रतिनिधींना दिलेत. ज्या बँका कर्ज पुरवठा करण्यास टाळाटाळ करतील अशा बँकातील खाते बंद करावे, असे निर्देशही मुख्याधिकाºयांना दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीस आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, नगररचना सह संचालक आढारी, सहायक संचालक श्रीमती कडू आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील नगर परिषदांनी विविध व्यवसायीकांसाठी हॉकर्स झोन तयार करावे, तसेच सर्व फेरिवाल्यांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या व्यवसायानुसार जागा द्यावी, तसेच ओळखपत्र देवून नियमित व्यवस्थे संबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचे सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, स्वयंरोजगाराअंतर्गत प्रस्ताव तयार करुन ते बँकाकडे पाठवावे व या प्रस्तावांचा नियमित आढावा घेवून बँकांनी सुध्दा या प्रस्तावांना निर्धारित वेळेत मान्यता द्यावी, असे निर्देशही यावेळी दिले.
नगर परिषद व नगरपंचायत यांनी पारुप विकास आराखडा तयार करण्याला प्राधान्य द्यावे व विकास आराखडा तयार झाल्यावर त्याला अंतिम मान्यता मिळण्याच्या दृष्टीने मुख्याधिकारी यांनी पाठपुरावा करावा. ज्या नगरपालिकांचे पारुप विकास आराखडा मंजूर होणार नाही त्यांना निधीच उपलब्ध होणार नाही. स्वयंरोजगार व बचतगटांना १० हजार रुपयापर्यंत फिरता निधी उपलब्ध करुन द्यावा, असेही यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur