
दिल्ली: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष् राहूल गांधी यांनी राफेल प्रकरणी गेल्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने नव्या दस्तावेजांच्या आधारे पुनर्विचार याचिकांवर सुनावणी करण्याचा निर्णय घेतला असता ‘सर्वोच्च न्यायालयानेच मान्य केले चौकिदार चोर आहे’ असे निवडणूक सभेत टिपण्णी केली या विरोधात भारतीय जनता पक्ष्ाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी अवमाननाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखत केली होती. सोमवारी दि. १५ एप्रिल रोजी यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राहूल गांधींना २२ एप्रिल पर्यंत खुलासा मागितला असून ‘आम्ही पंतप्रधान मोदी यांच्याविषयी कोणतीही टिपण्णी केली नसल्याचे’सांगितले.
प्रारंभी मुकुल रोहतगी यांनी राहूल गांधी यांनी त्यांच्या भाषणात काय टिपण्णी केली याचे विस्तृत विवेचन हिंदीत न्यायालयाला सांगितले. यावर इंग्रजीत सांगावे असे न्यायालयाने स्पष्ट करता रोहतगी यांनी राहूल गांधी यांच्या आरोपांचे इंग्रजीत भाषांतर करुन न्यायालयाला सांगितले. यावर आम्ही फक्त राफेल प्रकरणी दस्तावेजांच्या आधारे पुनर्विचार याचिंकावर सुनावणी करु पंतप्रधान मोदी यांच्याविषयी न्यायालयाने कोणतीही टिपण्णी केली नसल्याचे सांगितले. पण चौकिदाराने चोरी केली हे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले आहे, राफेल प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य मानले आहे. राफेल प्रकरणाची चौकशी झाली तर नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी ही दोन नावे पुढे येतील,असा दावा राहूल गांधी यांनी केला होता. पंतप्रधान माेदी यांनी भारतीय हवाई दलाचा पैसा चोरुन ३० हजार कोटी रुपये अनिल अंबानींना दिल्याचे आपण अनेक महिन्यांपासून सांगत आहे,ती गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली.सर्वोच्च न्यायालयाची गोष्ट केल्यामुळे आज अतिशय आनंदाचा दिवस आहे,असे राहूल गांधी म्हणाले होते. राहूल गांधीनी आपल्या विधानाद्वारे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप संरक्ष्ण मंत्री निर्मला सीतारमण यांनी केला होता. राहूल गांधी यांनी आदेशाचा एक परिच्छेदही न वाचता सर्वोच्च न्यायालयाने ‘चौकिदार चोर है’ म्हटल्याचे सांगून न्यायालयाचा अवमान केला,असे सीतारमण म्हणाल्या. आतापर्यंत राहूल गांधींनी पुरावे न देता वाटेल तसे दावे केले आहेत. पण आज त्यांनी न्यायालयाचा उघडउघड अवमान केला,असे सीतारमण म्हणाल्या.
राहूल गांधी यांनी राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीला तोडून मरोडून सादर केले. सध्या देशात लोकसभेच्या निवडणूका सुरु आहेत. स्वत:च्या फायदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाष्य केल्याचे केंद्रिय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्र-परिषदेत सांगितले. राहूल गांधी यांनी झूठची पटकथा लिहली. झूठ पर लृट कॉंग्रेसचे धारेण असल्याचे ते म्हणाले. देशाच्या इतिहासात राहूल गांधी यांनी राजकारणाचा स्तर सर्वात जास्त घसरवला असल्याचे ते म्हणाले.
राहूल गांधी यांना २२ एप्रिल पर्यंत सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण दाखल करायचे आहे. ते काय स्पष्टीकरण देतात याकडे देशाचे लक्ष् लागले आहे.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur