पटोलेंच्या ‘डीएमके’पॅटर्नला गडकरींच्या ‘विकासाची’लढत: भाग्य पेटीबंद

spot_img

नागपूर: केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व पूर्व भाजपाई व आता पुन्हा काँग्रेसवासी झालेले नेते नाना पटोले यांच्या हाय प्रोफाईल लढतीमुळे संपूर्ण देशाचे लक्ष् लागलेल्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरात गुरुवारी सुरळीत मतदान पार पडले. सकाळी ७ च्या ठोक्यालाच सरसंघचालक प्रमुख मोहनजी भागवत तसेच सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी महाल येथील मतदान केंद्रात मतदानाचा अधिकार बजावला. शहरातील सर्वच मतदान केंद्रामध्ये सकाळी ७ नंतर रांगा लागल्या होत्या. दूपारी १ वाजे पर्यंत २७. ४७ टक्के मतदान पार पडले होते. मतदानाची टक्केवारी बघता या लोकसभेच्या सीटवरुन निवडणूक लढणारे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे दिसून येते. पटोले यांनी आपला संपूर्ण प्रचार हा ’डीएमके’ म्हणजे दलित,मुस्लिम व कुणबी मतांकडे लक्ष् केंद्रित केला होता तर गडकरी यांनी त्यांचा संपूर्ण प्रचार गेल्या पाच वर्षात उपराजधानीत केलेल्या विकास कामांवर केंद्रित केला. मतांच्या या धृवीकरणाचा काय परिणाम होणार याकडेही संपूर्ण देशाचे लक्ष् लागले आहे.
नागपूरातून एकूण ३० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यात चुरस मात्र भाजप आणि कॉग्रेसमध्ये दिसून पडली. नाना पटोलेंच्या मागे गटा तटात विभागलेली काँग्रेस ही पूर्ण ताकदीनिशी उभी असल्याचे चित्र मतदारांनीही बघितले. मात्र ही खरंच ‘दिलजमाई’ आहे आणि गडकरींना हरवून नागपूरातून लोकसभेत काँग्रेसला आपला उमेदवार निवडूण पाठवायचा आहे याविषयी नागपूरातील मतदारही सांशक दिसले. बहूजन समाज पक्ष ,वंचित आघाडी व इतर पक्ष व अपक्ष् या दोन्ही मुख्य पक्ष्ांची किती मते खातात यावरच विजयी उमेदवाराचे मताधिक्य ठरणार आहे.२२ मे ला याचा निकाल लागेलच मात्र सध्यातरी गडकरी यांच्या विकासकामांची लढत ही नानांच्या डीमएके पॅटर्नवर भारी पडल्याचे चित्र नागपूरात होते. नागपूरातून एकूण २१ लाख ६० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. नितीन गडकरी यांनी सकाळी १० वा. सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी निखिल व सारंग गडकरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना,नागपूरचा मतदार हा खूप जागरुक असल्याचे सांगितले. मतदारांमध्ये खूप उत्साह दिसून पडतोय. नागपूरकर मतदारांना ‘बदलते नागपूर’ दिसून पडतंय,उन्हाची तमा न बाळगता मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडतोय. मतदार आपला राष्ट्रीय हक्क बजावतोय. १०० टक्के मतदान शहरात झाले पाहिजे. माझं मत मी विकासाला दिले आहे. यावेळी देखील गडकरी साहेब हे चांगल्या मताधिक्याने निवडून येेतील याची खात्री आहे. सुरवातीलाच ७ ते ९ दरम्यान ज्या पद्धतीने मतांची टक्केवारी वाढतेय ती निश्‍चितच विकासासाठी असलेली मतं आहेत,असे ते म्हणाले तर कांचन गडकरी यांनी आपला राष्ट्रीय अधिकार बजावताना आम्हाला खूप आनंद होतोय. प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदान केले पाहिजे असे त्यांनी आवाहन केले. नागपूरकर खासदार डॉ.विकास महात्मे यांनी देखील विवेकानंद नगर येथील मतदान केंद्रावर एक तास रांगेत उभे राहून सकाळी मतदान केले हे विशेष.
विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र मोदी लाटेत २०१४ मध्ये विदर्भातील सर्व दहा जागा भाजप-शिवसेना युतीने एकहाती जिंकल्या. यावेळी देखील त्यांना हा आकड कायम ठेवता येईल का?याकडे देशाचे लक्ष् लागले आहे. गुरुवारी विदर्भातील ७ जागांसाठी मतदान पार पडले तर देशातील एकूण ९१ जागांसाठी मतदारांनी मतदाना हक्क बजावला. मात्र नागपूर हे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे उमेदवारी क्षेत्र असल्यामुळे प्रचारकीचा धूराळाच येथे मोठ्या प्रमाणात उडाला. केंद्रिय मंत्री सुषमा स्वराज, उमा भारती, शहानवाझ हुसैन, गोव्याचे मुख्यमंत्री सावंत दिग्गजांसोबतच शेवटच्या दिवशी दूपारी ३ वा. लकडगंज येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष् अमित शहा यांनी सभा घेतली होती. गडकरी यांनी रामटेक येथील शिवसेनेचे उमदेवार कृपाल तुमाने यांच्यासाठी शक्ती पणाला लावल्याचे मतदारांनी बघितले आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनीही आज मतदान पडलेल्या सातही जागांवर भाजप-शिवसेना युतीचा विजय होणार असल्याचा दावा केला आहे. सद्सद् विवेकबुद्धिने मतदार राजा असाच पक्ष्ा च्या मागे उभा राहील असा विश्‍वास माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केला. सायंकाळी ५ वाजे पर्यंत नागपुरात मतदानाची टक्केवारी ही ५३.१३ टक्के एवढी नोंदवली गेली होती.

गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे घेऊनच जनतेपुढे आलो-गडकरी

महाल येथील महानगरपालिका शाळा मतदान केंद्रात सहकुटुंब मतदान केल्यानंतर गडकरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे घेऊन जनतेसमोर आलो असल्याचे म्हणाले. हा लोकतंत्राचा सर्वात मोठा उत्सव असून प्रत्येकाने आपला मतदाना हक्क बजावावा. मतदारांमध्ये चांगला उत्साह आहे.नागपूर लोकसभा मतदार संघासाठी मी जी कामे केली त्यासाठी लोकांचे मला पूर्ण समर्थन मिळत आहे. जनतेच्या पाठींब्यावर मला पूर्ण भरवसा आहे.गेल्या वेळी पेक्ष्ाही मी अधिक मताधिक्याने निवडूण येईल याचा मला विश्‍वास आहे.

 

 

देशात मजबूत सरकार येणार-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूपारी दहा वाजता धरमपेठेतील मतदान केंद्रात पत्नी अमृता फडणवीस व मातोश्रीसोबत मतदान केले. ही सीट मुख्यमंत्री यांच्यासाठी देखील अतिशय प्रतिष्ठेची झाली असून त्यांच्या पुढील राजकारणातील सर्व दारोमदार नागपूरसोबतच विदर्भातील दहा जागांवर निर्भर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गडकरी यांच्या प्रचारासाठी प्रत्येक प्रभागात सभांचा धुराळा त्यांनी उडवला. भाजपची मातृशाखा राष्ट्रीय स्वयं संघ देखील याच भूमीत आहे. त्यामुळे फक्त सीट राखण्याचेच नव्हे तर देशातील सर्वात जास्त मताधिक्याने निवडूण येणारा उमेदवार म्हणून गडकरी यांना संसदेत पुन्हा एकदा पोहाेचवण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. विधानसभेचीही ‘सेमी फायनल’म्हणूनच विदर्भाच्या या निवडणूकीकडे बघितले जात आहे. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,की जगातली सर्वात मोठी लोकशाही देश म्हणून भारताकडे बघितले जाते. हे लोकतंत्र तेव्हाच आणखी मजबूत होईल जेव्हा प्रत्येक मतदार हा मतदान करेल. मी आणि माझ्या कुटंूबियांनी मतदान केले आहे. पुढच्या पाच वर्षांत देश कोणत्या सक्ष् म हातात देणय्ाचा निर्णय जनतेने घेतला आहे. देशामध्ये एक मजबुत सरकार आणण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. तर अमृता फडणवीस यांनी प्रत्येकाने अापला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे असे आवाहन केले.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़