
नागपूर: काँग्रेस आणि नेशनल कॉन्फरेन्सने काश्मीरमध्ये गठबंधन केले आहे. नुकतेच त्यांच्या एका सभेत ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लागले तेव्हा काँग्रेस पक्ष्ाचे नेते चुपचाप बसले होते. जर भारतीय जनता पक्ष्ासोबतच्या गठबंधनातील कोणत्याही पक्ष्ाने असे नारे लावले असते तर दुसर्या च क्ष् णी भाजपने देशहितासाठी त्यांच्यासोबत गठबंधन तोडले असते. उमर अबदुल्ला म्हणता काश्मीरमध्ये दुसरे वजीर-ऐ-आजम राहतील,राहूल गांधी आणि उमर अबदुल्ला यांनी कान उघडून नीट एकून घ्यावे भारतीय जनता पक्ष् हा सत्तेत असो किवा नसो काश्मीरची एक इंच ही भूमी मिळणार नाही,काश्मीरला भारतातपासू न कोणीही वेगळे करु शकत नाही,अशी सिंहगर्जना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष् अमित शहा यांनी केली. ते मंगळवार दि. ९ एप्रिल रोजी नागपूरातील लकडगंज मैदानात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करत होते. याप्रसंगी मंचावर भाजपचे लोकसभेचे उमदेवार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, खा. कृपाल तुमाने, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले, सुलेखा कुंभारे, खा.अजय संचेती, आ.गिरीश व्यास, आ.सुधाकर देशमुख,आ. सुधाकर कोहळे, माजी खा.दत्ता मेघे, आ.डॉ.मिलींद माने, आ. कृष्णा खोपडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी,शिवसेना जि.प्रमुख प्रकाश जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अमित शहा म्हणाले,की काँग्रेस पक्ष्ाचे अध्यक्ष् केरळ मधील अश्या ठिकाणाहून निवडणूक लढतात आहे की ज्या गल्ल्यांमधून जुलुस निघतो तर ताे पाकिस्तानमधून निघतोय कि हिंदूस्तानमधून याची शंका येते. ज्या काश्मीरमध्ये श्यामा प्रसाद मुखर्जीने आपले बलिदान दिले त्या काश्मीरला हिंदूस्थानपासून वेगळे होऊ देणार नाही. म्हणूनच आम्ही संकल्प पत्रात कलम ३७० आणि ३५/ए हटवण्याचा संकल्प प्रसिद्ध केला आहे. माता भगिनीं ज्याप्रमाणे अडीचशे रुपयांचा माठ विकत घेतात तेव्हा ठिकर्य ाने तो ठोकून तपासून बघतात तो मजबूत आहे की नाही,तसाच आपला उमेदवार निवडा. गडकरी यांना प्रचंड बहूमताने निवडून द्या. मोदी यांच्याशिवाय देशाला कोणीही सुरक्ष्ि त ठेऊ शकणार नाही. पाकिस्तानला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ शकणार नाही. तिथून ‘गोळी’ चालेल तर इथून ’गोळा’ चालेल. ईट का जबाब पत्थर से दिया जायेगा. लाज वाटायला हवी काँग्रेस पक्ष्ाला नुकताच समझौता एक्सप्रेस बॉम्ब ब्लास्टचा निकाल आला.त्या स्वामी असीमानंदसहित सर्व आरोपींना दोषमुक्त करण्यात आले. काँग्रये, शिंदे,चिदंबरम या सर्वांनी या घटनेत हिंदूना अातंकवादी ठरवले.,मी नागपूरच्या याच धर्तीवरुन राहूल गांधीना निवडणूकीपूर्वी उत्तर मागतोय ते देशातील हिंदूंची माफी मागणार आहेत की नाही? ते नाही मागणार कारण हा गुण त्यांच्या स्वभावात नसल्याची बोचरी टिका यावेळी शहा यांनी केली. युपीएकडे नेता,नीती आणि सिद्धांतच नाही,असे ते म्हणाले. सत्तेच्या स्वार्थातून ते एकत्र आले, त्यांना देशाचे भले करायचे नाही. मोदींच्या नेतृत्वातील एनडीने विदर्भात नक्सलवाद्यांचे कंबरडे मोडले. नक्सली कारवाईत ३६ टक्क्यांनी घटली. .दोन्ही राज्यातील ३३० जिल्ह्ये हे नक्सल प्रभावित होते त्यांची संख्या आता ५८ जिल्ह्यापर्यंत आली असून ही देशहितासाठी फार मोठी उपलब्धी असल्याचे शहा म्हणाले.
विदर्भाच्या दहा ही जागांवर भाजप-शिवसेना आणि रिपबल्किन पक्ष् (आठवले)हे विजयी होणार असा विश्वास त्यांनी दिला. या नागपूर शहरातून आमच्या विचारधारेची सुरवात झाली.याच भूमीतून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समता आणि सामाजिक समरसतेचा संदेश दिला. दीक्ष्ा दिली. याच शहरातून देशात मोदी सरकार पुन्हा निवडूण येईल यांची नांदी हे शहर ठरणार असल्याचे ते म्हणाले. प्रारंभी त्यांनी पुलवामा घटनेत विदर्भातील नितीन शिवाजी राठोड आणि संजय राजपूत या दोन शहीदांना श्रद्धांजली अर्पित केली.
राहूल गांधी यांचे आंतवाद्यांसोबत ‘इलू इलू!’
आपल्या वीस मिनिटांच्या भाषणात शहा यांनीी राहूल गांधीवर प्रखर टिका करताना ४० जवानांच्या हौतात्म्यावर देशाने त्यांच्या तेरवीच्या दिवशीच सूड उगवला. या एअर स्ट्राईकमुळे देशभरात जल्लोष झाला,शहीदांच्या छायाचित्रांना माल्यार्पण भारतवासींनी केले. फक्त दोन ठिकाणी ‘सन्नाटा’ होता. एक पाकिस्तानात तर दूसरे काँग्रेस मुख्यालयात! सॅम पित्रोदा यांनी आंतकवाद्यांच्ये तळ नष्ट करण्यापेक्ष्ा बातचीतचा रस्ता स्वीकारण्याचा सल्ला दिला. देशातील चाळीस जवानांच्या हौतात्म्याला कसे उत्तर दिले पाहिजे? सूड उगवला पाहिजे कि नाही? की राहूल गांधी हे जसे आतंकवाद्यांशी ‘इलू इलू’ करतात तसे केले पाहिजे? असा प्रश्न त्यांनी सभेत जनसमुदायाल विचारला तेव्हा संपूर्ण पँडोलमधून ’देना चाहिये’ हा जयघोष निनादला. देशाला सुरक्ष्ि त ठेवण्याचे काम हे फक्त मोदी सरकारच करु शकते.‘आलीया,माल्या,जमालिया’यांची दहा वर्षे देशात सत्ता होती,देशातील सैनिकांचे ते धड कापून,डोळे फोडून परत पाठवायचे तेव्हा ‘मौनी बाबा मनमोहन’च्या शासनाने का कारवाई नाही केली? असा प्रश्न शहा यांनी केला.
गडकरी विकास कामात पक्के-
आपल्या भाषणात शहा यांनी नितीन गडकरी यांचे मनापासून कौतूक करुन फक्त नागपूरातच किंवा महाराष्ट्रातच नव्हे तर त्यांच्या कामाचा धडाका देशभरात कसा होता याचे विस्तृत विवेचन केले. नितीन गडकरी यांनी गेल्या पाच वर्षात विकास कामांचा जो धडाका लावला, त्याची यादी तपासून पहा, मुत्तेमवार येथे तीन वेळा खासदार राहीलेत,काँग्रेस पक्ष् पंधरा वर्षात विकास कामांची यादी देऊ शकेल का?राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार नक्कीच महाराष्ट्राला विकसित राज्य म्हणून देशाच्या नकाशात अव्वल आणतील असा विश्वासही शहांनी व्यक्त केला.गडकरी यांनी विकासाची एवढी कामे केलीत की त्यांच्या विरोधात उभे करायला काँग्रेस पक्ष्ाला उमेदवारच नाही मिळाला. काँग्रेसला आपला उमेदवार आयात करावा लागला असल्याची टिका त्यांनी केली. यावेळी गडकरींनी नागपूरात सुरु केलेल्या विविध प्रकल्पांचा उल्लेख त्यांनी केला. सोबतच भाजपच्या संकल्पपत्रात लहान व्यापारी, शेतकरी, सवर्ण विद्यार्थ्यांना शिक्ष् णात दहा टक्के आरक्ष् ण इत्यादीची माहिती जनसमुदायाल दिली.
शहा यांचा साधेपणा!
शहा यांना नागपूरमधून सभा संपवून तातडीने ओरिसा येथे जायचे असल्यामुळे ते नितीन गडकरी यांच्या भाषणासाठी थांबू शकले नाही मात्र निघताना पुन्हा त्यांनी गडकरी यांची मंचावरच गळभेट घेतली आणि त्यांना बसण्यास सांगितले. गडकरी यांनी त्यांना त्यांच्या कारपर्यंत सोडण्यासाठी पाऊल पुढे घेतले मात्र शहा यांनी गडकरी यांचे खांदे धरुन त्यांना खूर्चीवर बसवले व अश्या प्रकारच्या अौपचारिकतेची गरज नसल्याचे सांगून तुम्ही सभेला संबोधित करा असे म्हणून निघून गेले. नागपूरकरांच्या नजरेतून हा प्रसंग सूटू शकला नाही. त्यांना अमित शहा यांच्या भाषणासोबतच शहा यांचा साधेपणाही खूप भावला. शहा यांच्या संपूर्ण भाषणात त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला जनसमुदायाकडून उस्फूर्त उत्तर मिळत होते. ‘मोदी मोदी‘च्या घोषणेनी संपूर्ण मैदान अनेक वेळा गरजले. थोडक््यात ‘े ते आले….ते बोलले आणि सभा जिंकून निघून गेले’ अशीच चर्चा नागपूरकरांमध्ये सुरु होती.
(प्रस्तुत बातमी आचार संहिता सुरु होण्यापूर्वी न्यूज पोर्टलवर डिस्प्ले करण्यात आली आहे)



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur