अमित शाह मंगळवारी नागपुरात करणार प्रचाराचा समारोप

spot_img

नागपूर: लोकसभा निवडणुकीची धामधूम उद्या सायंकाळी ५ वाजता थांबणार. नागपुरातून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्या मंगळवारी दुपारी २ वाजता नागपुरात दाखल होत आहे. हैद्राबाद येथून ते सरळ नागपुरात येत आहे. विमानतळावर भाजप महानगरतर्फे त्यांचे स्वागत करण्यात येईल.
एअरपोर्ट वरून ते सरळ सरदार वल्लभाई पटेल मैदान, कच्छीविसा ग्राउंड वर प्रचार सभेचा समारोप करतील. या वेळी राज्यसभेचे सर्व खासदार, आमदार, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ता उपस्थित राहतील. शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. क्रिष्णा खोपडे, महामंत्री संदीप जोशी यांनी प्रचार सभेला मोठ्या संख्येनी उपस्थित राहण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.
आजच एनडीएचे ४८ पानी ७५ संकल्प असणारे संकल्प पत्र नवी दिल्लीत प्रसिद्ध झाले. परंपरेप्रमाणे काँग्रेस पक्षाने यावर टिका केली असून नागपूरच्या सभेत शहा काय बोलतात याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़