
नागपूर: गेल्या निवडणूकीत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूकीपूर्वीच नागपूर शहराप्रति आपला ‘वचननामा ’जाहीर केला होता. यंदा देखील त्यांनी आपली या शहराच्या विकासाप्रति कटिबद्धता जाहीर केली असून रविवार दि. ७ एप्रिल रोजी ‘बदलते नागपूर’ हा वचननामा उर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या हस्ते प्रसिद्ध झाला. नागपूर शहराला महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून येत्या पाच वर्षांत अधिक उंची प्रदान करणार असल्याचे वचन या वचननाम्यात देण्यात आले. याप्रसंगी मंचावर खा.अजय संचेती, गिरीश व्यास, शहर अध्यक्ष् आ.सुधाकर कोहळे,आ.सुधाकर देशमुख, महापौर नंदा जिचकार, माजी मनपा सत्ता पक्ष् नेते दयाशंकर तिवारी, चंदू पेंडके अादि उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना बावणकुळे म्हणाले,की ही अतिशय अभिमानाची बाब अाहे जे वचन गडकरींनी २०१४ सालच्या वचननाम्यात दिले होते त्या ‘स्मार्ट सिटी’कडे शहराची गेल्या पाच वर्षात वेगाने वाटचाल झाली आहे. गडकरी ही अशी विभूती आहे ज्यांनी अापल्या कामाने संपूर्ण देशात आपली छाप पाडली. पंतप्रधान मोंदींच्या मंत्री मंडळातील ते सर्वोकृष्ठ मंत्री ठरलेत. फक्त सत्ता पक्ष्ानेच नव्हे तर विरोधी पक्ष्ातील नेत्यांनी देखील गडकरी यांच्या कामाचा झपाटा आणि बांधिलकी बघून त्यांची प्रंशसा केली आहे. आयुष्याचे पाचही वर्षे १६ तास त्यांनी नागपूर शहराच्या विकासासाठी दिले. सर्वच पक्ष्ातील नेत्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. येणार्या कार्यकाळातही नागपूर शहराला आणखी उंची प्रदान करण्याचा तसेच उपराजधानी म्हणून काय-काय देता येईल याचा उहापोह म्हणजे गडकरी यांचा हा ‘वचननामा’असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात ७० कोटींचे काम अद्यापही सुरु आहेत.२०१४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रचंड बहूमताने नागपूरच्या मतदारांनी त्यांना प्रचंड बहूमताने निवडून संसदेत पाठवले यामुळे ते संसदेत मंत्री होऊ शकले. नागपूरच नव्हे तर संपूर्ण देशात विकासाची प्रचंड कामे करु शकले. नागपूरचा चेहरा-मोहरा बदलण्याचे आश्वासन गेल्या वचननाम्यात जी दिली होती त्यापैकी जवळपास सगळी कामे करण्यात यश मिळाल्याचे आपल्या वचननाम्यात गडकरी यांनी सांगितले. नागपूर शहरात राष्ट्रीय पातळीवरील आयआयएम, आयआयआयटी, एम्स, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, सिम्बॉयसिस अशा शैक्ष् णिक संस्था नागपूरात आणल्या. शहराची भविष्यातील गरज लक्ष्ात घेऊन मेट्रो रेल्वेचा प्रकल्प आणला. पहिल्या टप्प्यातील कामे पुढल्या चार महिन्यात पूर्ण होऊन लगेचच मेट्रोच्या दुसर्या टप्प्याच्या कामाला सुरवात होणार आहे. बरीच कामे करता आल्याचा आनंद असला तरी अनेक कामे करायची राहून गेली आहे. नागपूर हे सर्वांगसुंदर शहर व्हावं, येथील तरुणांना, रुग्णांना रोजगारासाठी व आरोग्यासाठी बाहेर जावे लागू नये यासाठी सगळी उर्वरित कामे येणार्या या काळात करण्याचे वचन देऊन पुढल्या पाच वर्षात नागपूरच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी,गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी पुन्हा एक संधी मतदारांना त्यांनी आपल्या ’वचननाम्यात’मागितली आहे. गेल्या निवडणूकीत दिलेल्या प्रत्येक योजनेची सुरवात झाली असून या वचननाम्यात त्याच्या पुढील टप्प्यातील कामे नमूद करण्यात आली असल्याची माहिती खा.अजय संचेती यांनी दिली.
हे आहे गडकरींचे स्वप्नं
– नागपूर शहरात आरोग्य क्ष्ेत्रात उत्तुंग काम करने. दिल्लीच्या एम्सच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेले वर्धा मार्गावरील भारतीय आयुर्विज्ञन संस्थेचे काम पूर्ण करणे.
-तरुणांना रोजगार व शैक्ष् णिक मार्गदर्शन. आयआयएम, आयआयटी, एम्स, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी,सिम्बॉयसिस अश्या एकापेक्ष् ा एक सरस संस्था नागपूराता आणल्या असून वर्धा रोडला ज्ञान समृद्धि मार्ग म्हणून विकसित करणार. देशातील नामांकित आणि निवडक संस्थांना आमंत्रित करुन ना नागपूरला एज्यूकेशन हब विकसित करण्याचा मानस.
– मिहानमध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटरची स्थापना. दिल्लीत प्रगती मैदानावर जसे विजनेस फेअरचे आयोजन होते त्याच धर्तीवर हे सेंटर २५० हेक्टर जागेवर सुरु करणार.
– मिहानमध्येच डिफेन्स मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग हब करणार तयार
– पश्चिम नागपूरातील तेलंगखेडी उद्यानाच्या जागेवर भव्य असे अॅग्रो कन्वेशन सेंटर उभारणार.
-रेल्वेचा विस्तार. नागपूर-रिवा,नागपूर-गोवा, नागपूर-जोधपूर, नागपूर-मुंबई अतिरिक्त ट्रेन, नागपूर-दिल्ली मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये वाढ,नागपूर-अहमदाबाद यासोबतच नागपूर रेल्वे स्टेशनचे अत्याधूनिकरण, अजनी रेल्वे स्टेशनचा विश्वस्तरावरील विकास, नागपूर शहरालगतच्या कामठी, गाेधनी,खापरी स्थानकांचे विस्तारीकरण
-मुख्य रेल्वे स्थानकारसमोर आठ लेनचा रस्ता हा महत्वाकांक्ष्ी प्रकल्प
-ब्रॉडगेज मेट्रो-नागपूर ते काटोल,वर्धा, भंडारा मेट्रो रेल्वे प्रकल्प राबविणार
-अपघातमुक्त शहर करण्यासाठी एनएचएआय, महानगरपालिका, राज्य सरकार एकत्रितपणे काम करणार
– वर्धा रोड वरील ऑरेंज सिटी स्ट्रीटचे भूमिपूजन पार पडले असून लवकरच कामाला सुरवात
-रेडिमेड गार्मेंंट झोन- एम्प्रेस मिलच्या जागेवर रेडिमेड गार्मेंट झोन -३०० स्के.फू.च्या जागेवर निर्माण करणार
-खासदार क्रीडा महोत्सावाची सुरवात केली असून शहराच्या विविध भागात ३०० खेळांची मैदान विकसिकत करणार
– नागपूरचा उद्यो विस्तार लक्ष्ात घेता विमानतळाचा करणार
-नागपूरचा नावलौकिक सांस्कृतिक शहर म्हणून आणखी वाढवणार.युथ फेस्टिवलचे आयोजन,अंबाझरी उद्यानाजवळ देखणे स्टेडियम, शहरातील सहाही विधानसभेच्या मतदारसंघात किमान दोन छोटी सभागृहे, नागपूरातील प्रतिष्ठित कलावंताचा गौरव
-रस्ता रुंदीकरण-बस स्थानकांचे आधूनिकरण- खाजगी सार्वजनिक बस डेपो-तलावांचे सौंदयीकरण,जागतिक स्तराचे म्यूझिकल फाऊंटेन,गॅसवरील इस्त्री, फ्लाय ॲशपासून विटांची निर्मिती,शिल्पग्राम योजना, एक लाख घरे देण्याचा मानस
– नागपूरात अवतरणार चित्रनगरी-फिल्म सिटी गोरेगाव तसेच हैदराबाद येथील रामोजी सिटीच्या धर्तीवर नागपूरात चित्रनगरी उभारणार-ओपन एअर थेटर
-नागनदीचे सौंदर्यीकरण, कचर् याचे सग्रीगेशन, मल:निस्सारण योजना, खासदार थाळी योजना, सावजी पॅटर्नचे ब्रॅण्डिंग, खासदार पुस्तक मेळा,वातानुकुलीत व्यापारी केंद्र,स्वदेशी मॉल,नवे पर्यटन स्थळ, ट्रांसपोर्ट झोन, विणकरांसाठी क्लस्टर, समृद्धि ज्ञान मार्ग विकसित करणार, लॉजेस्टिक पार्क उभारणार.
-शहरातून गुन्हेगारांना हद्दपार करणार.
…………………………
–



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur